“छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार – २०१९” वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते वितरण…
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते देण्यात आला .
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण,वस्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आला आहे. पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्र येथे विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

पूरस्काराचे स्वरूप
सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पंचाहत्तर रुपये असे या पूरस्काराचे स्वरूप आहे. वनश्री सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित आहे. या प्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव, महसूल व वनविभाग प्रधान सचिव(वने) बी.वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.सुनिता सिंग, विभागिय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) अमोल थोरात, वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) हनुमंत धुमाळ,पुणे येथील विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासन वन विभागाचे वतीने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.राज्यात वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.
सुशांत घोडके कोण आहेत त्यांचे काय योगदान आहे ?
कोपरगाव तालुक्यात स्वच्छतादूत आणि पर्यावरण प्रेमी म्हणून सुशांत घोडके यांचे कार्य अनेक वर्षांपासून सर्वांना परिचित आहे.हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन माध्यमातून सुशांत घोडके यांनी कोपरगावसह खेड्यापाड्यात रुजवलेली वृक्षारोपण चळवळ, विविध पक्षी, प्राणी यांना दिलेले जीवदान,वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेली जनजागृती केली आहे.
देशी झाडांसह,कडूलिंब, फुलझाडांचे महत्व जाणून हजारो रोपांचे वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.या शिवाय लोकसहभागातून शाळा व सार्वजनिक ठिकाणी फुल झाडांची उद्यान विकसित केले आहे.शाळा, महाविद्यालय,वसतीगृह यासह सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय आहे.
अलीकडेच त्यांनी पक्षी व पर्यावरणास हानीकारक नायलाॅन धाग्यावर प्रखर जनजागृती त्यांनी केली आहे. चिमणी दिवसाला पक्षी घरटी वाटप सारखे उपक्रम त्यांनी राबविला आहे . या आधी हि सुशांत घोडके यांना कलाउपासक, समाजरत्न, नाट्य मंदार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय प्रथम एकाच वेळी घोषित झालेले अहमदनगर जिल्ह्यातील ते पहिले व्यक्ती ठरले आहे. शिर्डी उपविभागात त्यांचे पर्यावरणावर उल्लेखनीय कार्य आहे.
Congrats sushant. Proud of you
Keep it up. Saibaba bless you