छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

राज्य सरकार वन विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार पुणतांबा रस्तापूर गावाला वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण दि. 26मार्च 2023 रोजी दुपारी पुणे येथील यशदा यासंस्थेत करण्यात आले.
पुणतांबा रस्तापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक वृक्ष लागवड करुन सदर वृक्ष जगविण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल नाशिक विभागात प्रथम क्रमांक व राज्य स्तरीय दुसरा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने पुणतांबा रस्तापूर ग्रामपंचायतीला सम्मानित करण्यात आले
डॉ. धनंजय धनवटे यांची पहिली प्रतिक्रिया :
समस्त ग्रामस्थ पुणतांबा रस्तापूर यांच्या अथक परिश्रम ,यामुळे पुणतांबा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांना,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व महिला भगिनी ज्यानी अथक परिश्रम घेतले, सर्वांना समर्पित. सर्वांचे मनापासून अभिनंदन .