भाविकांनी साई दरबार फुलाला …
Credit : Saibaba Trust shirdi .
आज श्री रामनवमी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्री साई सेवक मंडळ व श्री साईलीला मंडळ, मुंबई या मानाच्या पालखींनी हजेरी लावली. तर उत्सवानिमित्त व्दारकामाई मंडळ, मुंबई यांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व श्री साईप्रसादालयाच्या प्रवेशव्दारावर शिव भोला भंडारी…साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहे. याबरोबरच समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
