साई मंदिर श्री राम नवमी उत्सव क्षणचित्रं

Credit : Sai Turst shirdi .

तीन दिवस चालणारे श्री राम नवमी उत्सवाचे मुख्य दिवसाचे साई मंदिर पारंपरिक ,धार्मिक कार्यक्रमांचे क्षणचित्रं

श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिरात श्रींची विधीवत पाद्यपुजा करताना संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दिपक केसरकर, संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, सौ.मिनाक्षी सालीमठ, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.
श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याची पुजा करताना संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा आणि तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दिपक केसरकर, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *