यावर्षीचा सरगम पुरस्कार सुहासभाई मुळे यांना जाहीर…

सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त १८ जूनला विशेष संगीत सभेचेआयोजन

नगर – जिल्ह्याच्या संगीत क्षेत्रात भरीव योगदान देत अभिजात भारतीय संगीताचा वारसा व सामाजिक सौहार्दता जोपासण्याऱ्या सरगमप्रेमी मित्र मंडळ या संस्थेने स्थापनेचे ४५ वर्ष पूर्ण केले आहेत.
संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.१८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘४५ वा वर्धापनदिन संगीत सभा २०२३’ या विशेष संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नगरच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हॉलमध्ये ही संगीत सभा होणार आहे, अशी माहिती सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष राम शिंदे यांनी दिली.
सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या या विशेष संगीत सभेत प्रा.अभिजित अपस्तंभ व सौ.मानसी अपस्तंभ या प्रसिद्ध उभयता गायकांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायन होणार आहे. यावेळी नगरचे मकरंद खरवंडीकर हे संवादिनीची व प्रसाद सुवर्णपाठकी हे तबल्याची साथसंगत करणार आहेत.
सांगीतिक क्षेत्रात काम करताना सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक जाणीव ठेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान केला जातो.
या वर्षी चा पुरस्कार जागरुक नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुहासभाई मुळे यांना त्यांच्या सांगीतिक, सामाजिक, साहित्यिक, कला आणि अन्य वैविध्यपूर्ण योगदानाबद्दल प्रदान करून सरगम सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अ.भा.गांधर्व मंडळाचे रजिस्ट्रार श्री.विश्वास जाधव यांना नुकतेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे , अहमदनगर जिल्ह्याला हा प्रथमच सन्मान मिळालेला आहे
त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे, अ.ए.सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं.बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही विशेष संगीत सभा सरगमच्या सर्व सभासदांसाठी त्याचबरोबर संगीत साधक आणि रसिक नागरिकांसाठी खुली असून ही संगीत सभा सायंकाळी ६ वाजता वेळेवर सुरु होईल. जास्तीत जास्त रसिक नगरकरांनी या मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *