गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक
दोन मंत्र्याच्या चुरशीचा गुलाल ,सभासद मालामाल.
राहाता तालुक्यातील सहकारी कारखानदारीचा व राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने गणेश सहकारी कारखाना हा नेहमीच निर्णायक ठरला आहे. आज या कारखान्याची निवडणूक होत आहे. हि निवडणूक अत्यन्त वेगळी आहे. दोन आजी माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे पहिल्यांदा समोरासमोर उभे ठाकले आहे. हि प्रत्यक्ष लढाई पहिल्याच वेळेला सभासद व परिसरातील नागरिक अनुभवत आहे.
आज मितीला या कारखान्यावर दोनशे कोटींचं कर्ज आहे. हा कारखाना गेले दोन दशक हा या राजकीय महासत्ताच्या डावपेचात बंद चालू अश्या अवस्थेत आहे. गेल्या दशकात शिर्डीतील व्यावसायिक भाजपाचे राजेंद्र गोंदकर यांनी हा कारखाना चालविण्यास घेण्याची कायदेशीर कार्यवाही सुरु केली. तेव्हा विखे भाजपात नव्हते. राजेंद्र गोंदकर यांनी सुमारे एक कोटी रुपये गणेश कारखान्यात गुंतवले होते. ते पैसे आजही अडकलेले आहे. या संपूर्ण निवडणुकीत यावर कुणी चाकर शब्द उच्चारला नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व राजेंद्र गोंदकर हे एकाच पक्षात म्हणजेच भाजपात आहेत.
विखे पाटलांनी जे वाळू धोरण अंमलबजावणी केली. तसेच त्यांनी संगमनेरात लक्ष केंद्रित केल्याने बाळासाहेब थोरात यांनीही आता विखेंच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. एकूणच या निवडणुकीत कोल्हेंच पारडं जाड दिसत आहे. त्यासोबतच विखेंचे निष्टावान अत्यंत नाराज असल्याचे चित्र आहे .
बहुदा हि लढत आता विधानसभा व लोकसभा या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे.
सहकारातील हि निवडणुक चुरस हि नवा पायंडा पडणारी आहे. सभासदांवर पैशाचा पाऊस पडला आहे. गणेशच्या या निवडणुकीवर या आजी माजी मंत्र्यांचे राजकारण कुठल्या दिशेने जाईल याकडे परिसराचे लक्ष लागलेले आहे. हे दोन्ही मंत्री समोरासमोर एकमेकांचे विरोधात म्हणून उमेदवारी केली तर नवल वाटण्याचे कारण नाही . .