कुर्बानीची कुर्बानी.
मुस्लीम समाजाच डोळस मार्गक्रमण ..
भारतात अठरापगड जाती धर्म आहेत. प्रत्येकाच्या रीतीभाती वेगळ्या आहेत. त्या साजऱ्या करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. अलीकडे समाज माध्यमातून बुद्धिजीव विचार प्रवाह समोर येवू लागले आहे . त्याचे चांगले परिणामही समोर येत आहेत .
अनेक रीती रिवाज हे कालबाह्य होत आहेत . किंवा बुद्धी प्रमाणावर टिकाव धरू शकत नाही असे त्या रीतीभाती आपोआप लोप पावण्याची प्रक्रिया हि शतकानुशके सुरु आहे .
त्यातूनच यंदा मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीला येणारी बकरी ईद हि कुर्बानी शिवाय साजरी करण्याचा निर्णय अनेक गावातून घेतला गेला . हा एक परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. यातून मुस्लिम समाजाची डोळसवृत्ती वाढीस लागली आहे ,हे उघड होते. अर्थात हे परिवर्तन स्वतःला प्रश्न विचारले व त्याची उत्तरे स्वतःच्या मनाने दिली तर लवकर होते . यातून काही विसंगत रीती किंवा कालबाह्य ठरतील .
मुस्लिम समाजाच्या या निर्णयाने जाती द्वेषाचे राजकारणावर आपली दुकाने चालवणारे राजकारणी दुखी असतील . कारण त्यांना नवा वाद निर्माण करण अशक्य होईल. हा निर्णय घेणारे मुस्लिमांचे अभिनंदन करण्यास पात्र आहेत. खर तर त्यांच्या या निर्णयाने त्यांनाही आत्मिक सुख मिळणार आहे.
असो कुर्बानीची गोष्ट अत्यंत संवेदनशील आहे. ती समजण्यासाठो हादिस ,पवित्र कुराण हे वाचावं लागेल. त्याचा खरा अर्थ समजून त्याच अनुकरण हे मानवीयतेकडे जाणार आहे.