संकट मोचन “ अजित पवार ”

महाराष्ट्र राज्य सध्या देशातल्या व जगाच्या प्रसार माध्यमात गाजत आहे . पुन्हा एकदा राष्ट्रवादी शिवसेनेच्या वाटेवर चालली. म्हणजेच आम्हीच शिवसेना तसेच हे आम्हीच राष्ट्रवादी हाच सूर पकडत अजित पवार सरकार मध्ये सहभागी झाले . सर्वत्र टीका सुरु आहे . अर्थात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . हि उक्ती खरी करत आमच्या राज्यातील राजकारणी राजकारण करीत आहे . 

या सर्व दलबदलात पक्ष कार्यकर्ते जाऊ कुणाकडे ,पाहू कुणाकडे असे केविलवाणे झालेले आहेत . पण नेत्यांना याच काही देणं घेणं नाही . त्यांना राज्याच्या कारभारात सक्रिय राहायचं आहे . त्यासाठी त्यांना कोणत्याही युत्या आघाड्या करण्याची वेळ आली तरी त्या करण्यास ते तयार आहेत . याचाच एक भाग म्हणजे सध्याची राजकीय स्थित आहे . 

https://www.facebook.com/reel/261177876463385

महाविकास आघाडीचं सरकार पडून शिवसेना फोडून फडणवीसांचं सरकार आलं . पण ते बेकायदा आहे . हे सांगायला सर्वोच्च न्यायालय विसरले नाही किंवा त्यांनी कडे दुर्लक्षही केलं नाही .त्यासोबतच नेत्याचा न्याय करणे जनतेवर सोपवत राज्याच्या घटनात्मक राजकीय उलथापालथीवर निकाल दिला, तो पूर्णपणे सर्व धुरंधर राजकारण्यांना चीत करणारा होता व आहे . त्याचे परिणाम आणखी वेगवेगळ्या राजकीय प्रसंगातून जनतेसमोर येणार आहेत .ते जस जसे उद्भवतील तसतसे या राजकारण्यांच्या राजकीय कारकिर्दीवर संशय व अविश्वास वाढत जाणार आहे .एकूणच घटनात्मक पेच निर्माण झालेले आहे . अर्थात हे कर्म आमच्याच राजकारण्यांचे आहे . गेल्या महिन्यात शरद पवार यांनी अचानक एकनाथ शिंदेची अराजकीय भेट घेतली होती.निमित्त कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचं होत.  त्याचे  पडसाद त्यांच्या राज्याच्या राजकीय पटलावर स्पष्ट्पणे उमटणार आहे . हे स्पष्ट होत. हा सर्व प्रकार सामान्य जनतेच्या लक्ष्यात यायला मोठा कालावधी जाईल.

२०२९च देशाचं राजकीय चित्र पाहता . तेव्हा देवेंद्र फडणवीस , अरविंद केजरीवाल , राम माधव , राहुल गांधी , प्रियांका गांधी , आदित्य ठाकरे ,राघव  चड्ढा , जगन मोहन रेड्डी , अजित पवार , सचिन पायलट ,योगी आदित्यनाथ , या राजकीय व्यक्तीच्या अवती भोवती फिरणार राजकारण असणार आहे . दक्षिणेकडे आजही जुण्याजाणत्या लोकांनी खुर्च्या अडवलेल्या आहेत .तिथे बदल घडायला कालावधी जावा लागेल . 

सध्या राज्यात सुरु असलेलं राजकारण हे सामान्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे . भारतीय सामान्य माणूस हा कायद्याचा आदर करणारा आहे . तो जरी राजकीय विश्वस्त निवडून देत असला तरी त्याला नागवणे ,चकरा मारायला लावणे, विनाकारण त्याचे साधे सोपे सरळ काम हे काम चुकार नोकरशाहीने लांबवला आहे .हे कळूनही त्याचे विश्वस्त त्यावर आवाज उठवत नाही . किंवा त्याला न्याय देत नाही . हा मुद्दा लोकांना अंगवळणी पडला आहे . त्यामुळेच तर नेता कुठेही जावो कार्यकर्ते त्याच्या मागे आहेतच . नेता हीच निष्ठा ,नेता हाच पक्ष इतके भोळे भाबडे कार्यकर्ते लाभायला नशीब लागत .ते नशीब राज्यातील नेत्यांना लाभलेल आहे . 

दक्षिणेतल्या राज्यात सिनेमात पोलीस व राजकारण्यांना चॅलेंज देणारे हिरोला खासकरून पसंती आहे . तशी आपल्या महाराष्ट्र्र तू गप रे , खाली बस रे , काय लावलाय दादा पादा या लोकबोलीतले अजित पवार कार्यकर्त्यांना आवडतात. त्यांनी राजकीय अस्मितेचे दोन्ही प्रसंगी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन भाजपसह इतर राजकीय पक्षांसाठी संकट मोचकाची भूमिका निभावली आहे . हे राज्याच्या राजकीय इतिहासात नक्कीच लिहिलं जाईल.   

( हे राजकीय विश्लेषण पत्रकार माधव ओझा यांनी लिहिलेल आहे . हा लेख आपल्याला छापायचा असेल तर बदल न करता छापण्यास लेखकाची परवानगी आहे . )

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *