अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय , शिर्डी
अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे . याचे मुख्यालय सुमारे दोनशे कि मी त्रिजेच आहे . आताशी सरकारला हि बाब लक्ष्यात आली . किंवा सनदी सेवा करीता पदनिर्मितीसाठी अशा कुठल्याही कारणाने असो पण आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय , शिर्डी सुरु होण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे . यासाठीच शासन आदेश पारित झाला आहे . हि प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष जिल्हा विभाजन नाही . याची दुसरी बाजू हि नागरिकांच्या दृष्टिने फायद्याची व सोयीची बाजू आहे .आता जिल्हाधिकरी कार्यालयात होणाऱ्या सुनावण्या , प्रकरणे यासाठी लोकांना अहमदनगर ऐवजी शिर्डी येथे यावं लागेल .
याची दुसरी बाजू म्हणजे अवघ्या दीड कि मी शहरात विनाकारण गर्दी करून आणखी गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे . या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे . ते म्हणजे लोकांना यातना सहन करून कार्यालयांचे उंब्रे झिजवण्याची वेळ येते हे हि कार्यालय याला अपवाद नसणार आहे . यासोबतच या कार्यलयाचा कारभार पाहणारे प्रत्येकाचे वि आय पी साई दर्शनाला येतील. तेव्हा शिर्डीकर हे सर्व सहजतेने सहन करतील का ? हा प्रश्नच आहे .