खासदार सदाशिव लोखंडे यांची वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांना सदिच्छा भेट…
निर्माल्य संकलन वाहन व सार्वजनिक विषयावर चर्चा…
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे कोपरगांव येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली.

या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष,निवृत्त सैनिक अधिकारी मारुती कोपरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके, प्रगतशील शेतकरी मंदार आढाव,क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके,दिलीप गायकवाड,शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,उपजिल्हाध्यक्ष मनिल नरोडे, तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात, देवा लोखंडे, उपशहरप्रमुख संदिप डुंबरे, ग्राहक केंद्राचे अनिल पवार, प्रकाश खडांगळे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी उपस्थितांचे स्नेहवस्र,सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले.