पैसा खाण्यासाठी निवडणूक लढायची म्हणून निवडणुकीला पैसा लागतो.
मित्रानो ,
मला सामान्य जनतेच या प्रक्रियेत सहभाग घेणं वाढवायचं आहे.म्हणजे स्वतंत्र विचार असलेले लोक सत्तेत येण्याची मार्ग मोकळा होईल की जो पैशाच्या जोरावर सत्तेत आलेला नसेल.जर दिल्लीची सत्ता आप पार्टीला बिना पैशाची मिळाली तर आपल्याला का नाही मिळणार ?
अपक्षच का ?
अपक्ष म्हणजे स्वतः चा स्वतंत्र विचार करण्याची शक्ती असलेली उमेदवारी. पक्ष ,पार्टी यांनी दिलेली उमेदवारी हि त्यांचा विचार प्रवाह केवळ निवडणुकी पुरता मान्य जरी केला तरी त्यातून बाहेर येण्याचे मार्ग स्वीकारण्याची शक्ती नसलेला समूह.
लोकांना पर्याय द्यायचा आहे. मग तो एखादा का ?
आपल्याला लोकांना पर्याय द्यायचा आहे. मग तो एखादा का ? खुप सारे का देवू नये . जर सर्व अपक्ष निवडून येतील तर सर्व अपक्ष निवडणूक लढले ते एकत्रपणे त्यांच्या विचाराने गावगाडा हाकतील.
काय आहे,आज आपल्याला निरपेक्ष ,इमानदार पर्यायच नाही. कारण सर्व राजकीय पक्ष हे आपले गुलाम उभे करतात. त्यांना स्वतः चां निर्णय घेण्याची क्षमता नाही. असे लोक आम्ही निवडून देतो. याने काहीच साधत नाहीय. ज्याला वार्डातील गटार स्वच्छ करून घेता येत नाही.असं बुजगावणं आम्ही निवडून देतो. हे चित्र जोपर्यंत सामान्य नागरिक हा निवडणूक रिंगणात येणार नाही तोपर्यंत हे गुलाम सत्तेला चिकटून रहातील.
पैसा खाण्यासाठी निवडणूक लढायची म्हणून निवडणुकीला पैसा लागतो.
जो उमेदवार किंवा पार्टी पैसा खर्चून निवडणूक लढते ती किंवा तो हे पैसे खाण्यासाठी निवडणूक लढतात. हा अनुभव आपण सर्वांनी आजवर घेतलेला आहे.म्हणूनच तर लोकांनी वर्गणी करून निवडून दिलेले लोक सत्तेत भोगल्यावर आर्थिक गब्बर झालेले दिसतात. ज्या लोकांनी लोकशाही आणि निवडणूकही धंदा केला आहे. त्यांना जमिनीवर आणण्यासाठी तुम्ही रिंगणात उतरा हे उंदीर सगळे सत्तेचं जहाज सोडून पळतील.
अशा परिस्थितीवर उपाय आहेत का तुमच्या कडे ?
जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन करायला पैसे नाही. वसूल नाही तरीही पैसा खर्चून निवडणूक लढली जाते. याचा उघड अर्थ आहे की तिथे भ्रष्टाचार केला जातो.जे लोक पैसा खर्च करून निवडणूक लढतात ते त्यांचे पैसे काढून घेण्यासाठी प्रसंगी दुप्पट करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. यातून त्यांचं स्वतः च भलं होत, गावाला काही उपयोग होत नाही म्हणूनच पाणी प्रश्न ,रस्ते,दळणवळण असे पायाभूत प्रश्न हे पिढ्यान् पिढ्या सुटत नाहीत.
पैशाच्या जोरावर निवडणुका लढणारे समाजद्रोही, हे कुणाचेच नाही.
पैशाच्या जोरावर निवडणुका लढणारे समाजद्रोही आजवर आपल्यावर सत्ता गाजवित आहे. परिणाम आपल्या पिढ्या भोगत आहे. या दुष्ट चक्रातून बाहेर येण्यासाठी जनतेचा सहभाग या निवडणूक प्रक्रियेत वाढला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात भावी पिढी ही मानसिक गुलाम असेल. आजही आहे पण किमान स्वतंत्र विचार मांडण्याची संधी मिळत आहे. ती भविष्यात मिळणार नाही.कदाचित या शेवटच्या एक दोन निवडणुका असतील ज्यात तुम्ही मतदान करू शकाल. यांनी निवडणूक पैशानी जिंकता येतात हा गैरसमज पसरवून तुमच्या मेंदूचा ,बुद्धीचा ताबा मिळवला आहे.तुम्ही आज याना जमिनीवर नाही आणले तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही घरी असाल आणि तुमचे मतदान करून घेतलेले असेल. असेही दिवस पाहायला मिळतील.
मला जो लोक जागर करायचा आहे तो मी केला आहे.कासव गतीने बदलणारे व काडी ने औषध लावणारे लोक क्रांती करू शकत नाही. माझं सजीव जिवंत समाजासाठीचा विचार आहे. भित्र्या लोकांनी यापासून दूर राहून गुलामी केलेली बरी.
वंदे मातरम
माधव ओझा ,पत्रकार ,पुणतांबा @९९६०००४२५८