कोपरगावात बिबट्याच्या मादीचा मुक्त संचार
कोपरगाव बस स्थानकाच्या परिसरातून धरणगाव रस्त्यावर मादी फिरताना आढळली . त्यानंतर लोकांनी तिच्या मागे फिरून मोबाइल मध्ये शुटींग घेत फिरताना नागरिक दिसत होते.
सुरु असलेल्या गोंधळात वन विभागाचे लोकही घटना स्थळी आले. त्यांनी मध्यरात्री या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्नही केला पण त्यात यश मिळाले नाही. आज विशेष पथक येणार असून या मादीला पकडून संगोपन केले जाणार आहे. कारण ही मादी गरोदर असल्याची शक्यता वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनावणे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान लोकांनी गोंधळ करून ,विनाकारण धाडस दाखवीत या बिबट्याच्या जवळ जाऊ नये. त्याला त्रास दिल्याने ते नागरिकांवर हल्ला करू शकते. त्यामुळे नागरिकांना परिसरात जिथे कुठे वन्य प्राणी आढळून येतील याची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन प्रतिभा सोनावणे यांनी केले आहे .