सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती कु.गौरी अलका पगारेवर शुभेच्छाचा वर्षाव
गौरीने सरस्वती वंदना गाऊन पवार सरकार महादेवाला दिली हजेरी
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी असलेल्या गौरीने सारेगमप लिटिल चॅम्पची प्रथम क्रमांक विजेते पद पटकावले आहे. आजोबा व मामांच्या देखभलीत हि चिमुकली कलाकार मराठी कला विश्वाच्या शिखरावर पोहचली आहे. तिच्या आवाजाने कोपरगावच नाही तर जगभरातील मराठी रसिकांना भुरळ घातली आहे .

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान, सराफ बाजार,कोपरगांव येथे सारेगमप लिटिल चॅम्पची प्रथम क्रमांक विजेती कोपरगांव भुषण कु. गौरी अलका पगारे हिने सदिच्छा भेट देत अभिषेक करुन दर्शन घेतले आहे.गौरीने सरस्वती वंदना गाऊन पवार सरकार महादेवाला दिली हजेरी यावेळी कोपरगावतील श्रीमंत पवार सरकार महादेव मंदिरात सरस्वती वंदना गाऊन हजेरी देत सोमेश्वर महादेव देवस्थाचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक जयंत विसपुते, पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, नंदू शेंडे, सोमेश्वर भक्त मंडळाच्या रजनीताई ठोंबरे, सौ. संगिताताई पाटील यांचेसह उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
गौरीच्या या यशाचे मानकरी हे तिचे मामा,आजोबा , आई हे आहेत. मराठी वृत्त वाहिनीच्या प्रदर्शित सारेगमप लिटिल चॅम्पची प्रथम क्रमांक विजेती कु.गौरी अलका पगारे हीचे यशाबद्दल सूर्यतेज संस्थापक व पवार सरकार देवस्थानचे सीईओ सुशांत घोडके यांनी गौरीच्या घरी सदिच्छा भेट दिली…गौरीच्या परिवारांशी मनसोक्त गप्पा मारल्या. व गौरीला स्नेहवस्र,सन्मानचिन्ह,पुष्प गुच्छ आणि पैठणी देवून सन्मान करत अभिनंदन केले…या प्रसंगी सरपंच अनुराग येवले,निवृत्तीकाका बनकर,पोलीस पाटील रविंद्र बनकर,गौरीला गायनाची आवड लावणारे राहुल कांबळे सर,अनंत गोडसे, रंभाजी पगारे(गौरीचे आजोबा),रोहिदास पगारे(मामा).विलास पगारे(मामा), कैलास पगारे(मामा) या सह ग्रामस्त उपस्थित होते…
