सरकार डोळे झाकून बसलय ,
म्हणून तुम्ही फेसबुक वापरा किंवा नका वापरा तुमचा डाटा चोरणारच .
एनरॉईड फोन वापरताय , मग फेसबुकही वापरत असणारच. पण फेसबुक तुमची अत्यंत खाजगी माहिती सहजतेने चोरत आहे. तुम्ही ते वापरात असाल तर ते तुमच्या मित्रासह सर्वांची माहिती स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी ,पैसे कमावण्यासाठी वापरत आहे. हे आम्ही नाही ,फेसबुक स्वतः सांगत आहे. कबुल करीत आहे. तरीही आमची सरकार डोळे झाकून बसली आहे. नागरिकांच्या खाजगी जीवनाची व्यक्तिगत माहिती आणि ओळख फेसबुकला कशासाठी हवी आहे ,हा प्रश्न नागरिक विचारू शकत नाही. कारण फुकटात करमणूक हा नागरिकांचा उद्द्येश आहे. त्या मोबदल्यात आपली स्वतःची कुठलंही माहिती लोक या सोशल मीडियाला फुकटात द्यायला तयार आहेत. खाजगी माहिती-डाटा याबाबत ज्या लोकांना माहिती नाही. त्यांना जरा वेळ बाजूला ठेवले तरी चांगले शिक्षित , सरकारी अधिकारी , कर्मचारी हे ही या पटलावर उपलब्ध आहे.
तुम्ही फेसबुक वापरा किंवा नका वापरा तुमचा डाटा चोरणारच .

तस पाहता मी स्वतः फेसबुकच्या पाहिल्या दिवसापासून फेसबुक वर आहे. त्यामागे फक्त एकच कारण आहे. ते म्हणजे हे चक्रव्युव्ह आहे . यात तुम्ही अडकले कि परतीचा मार्गच उपलब्ध नाही. तुम्ही तुमचं अकाउंट बंद केलं तरी ते सुरूच ठेवलं जात. याला डार्क पॅटर्न म्हणतात. ते कुठल्यातरी पळवाटा दाखवून तुमचे खाते सुरूच ठेवतात. याच कारणांनी मी स्वतः यावरून अनेकवेळा बाहेर राहिलो व कायम बाहेर पडण्याचा मार्ग खुला होण्याची वाट पाहत होतो. आज सकाळी मेल आला कि तुमचा पासवर्ड बदलला आहे. ते तुम्ही असाल तर या मेल कडे दुर्लक्ष करा. अन्यथा आपले खाते सुरक्षित करण्यासाठी काही सूचनांचे पालन करण्याचा मार्ग दाखवला. यावर गेलो असता अत्यंत धक्कदायक बाबी समोर आल्या आहेत.
काय आहेत या धक्कादायक बाबी

फेसबुक सुरु करण्यासाठी ते तुमचा मोबाईल नंबर किंवा मेल आय डी घेतात. ते अनिवार्य आहे. त्यानंतर प्रोफाईल अद्ययावत करण्याच्या बहाण्याने तुमची खाजगी माहिती , तुमचे शिक्षण ,बालपण , जन्मतारीख , निवासाचे शहर ,तुमच्या आवडी निवडी , लग्नाचा वाढदिवस , बायकोचा वाढदिवस , मुलांचे बारसे , यापलीकडे जाऊन तुम्हाला पैसे देतो या नावाखाली तुम्हाला नाचवून घेऊन मॉनिटायजेशनच्या बहाण्याने तुमचे बँक खाते याची माहिती घेतात. लोक मोठ्या अपेक्षां बाळगून आपली बँक खाते माहितीही फेसबुकला देतात. आता त्यांनी नवीन मार्ग अवलंबला आहे.त्यांचं या सर्व माहिती शिवाय समाधान होत नाही म्हणून ते आता तुमचे कुठलेही ओळखपत्र ,रेशन कार्ड , ड्रायव्हिंग लायसेन्स , व्हिजा अशी मोठी यादी सार्वजनिक केली. त्यापैकी काहीही सादर करा म्हणून गळ घालत आहे.हे सर्व आमच्या सरकारच्या नाकावर टिचून केलं जात आहे. सरकारला नागरिकांच्या खाजगी माहिती सुरक्षेची कुठलीही काळजी नाही.
हे सर्व आम्ही आमच्या मनाने सांगत नाही .या लेखात जे स्क्रीनशॉट जोडले आहे. ते सर्व फेसबुकच्या स्वतःच्या संकेतस्थळावर ( वेब साईटवर ) राजरोस पणे प्रसिद्ध केलेलं आहे . युरोपियन युनियन या समूहात जे देश आहेत तिथली सरकार नागरिकांच्या हिताला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न करणारे संस्थांना कडक निर्बंध लादून नियंत्रित करतात.त्याउलट आमची सरकार आहेत, अशा संस्थांना आपल्या नागरिकांचा खाजगी माहिती (डाटा ) सहजतेने देताना डोळे झाकून बसते .
हा लेख teatimenewsचे संपादक माधव ओझा यांनी लिहिलेला आहे. हा जसाच्या तसा वापरण्यास लेखकाची कुठलीही हरकत नाही .