“गहू आणि हरभरा पिकांचे पीक संरक्षण “
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिके सध्या मुख्य वाढीच्या अवस्थेत आहेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी बांधवांनी गहू किंवा हरभरा पिकाची निवड केलेली असल्याने या पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन होत असेलच. या दोन्ही पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली थंडीही आता पुरेशा प्रमाणात पडायला लागली आहे. आता फक्त गरज आहे ती या पिकांचे कीडिंपासून संरक्षण करण्याची. कारण कुठल्याही पिकाला सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही त्या पिकांचे रोग आणि किडींपासून व्यवस्थित प्रकारे संरक्षण केले नाही तर पीक उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. गहू पिकावर मावा, खोडमाशी व खोडकिडा यांचा पेरणीनंतर तीन आठवड्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होऊ शकते. याकरिता पीक पेरणीअगोदर बीज प्रक्रिया अवश्य करावी. मावा कीड दिसून येताच मेटारायझियम ॲनिसोप्ली किंवा
व्हरटिसिलियम लेकॅनी, १.१५ %
डब्ल्यू. पी. ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसाचे अंतराने करावी. मावा कीड दिसून येतात थायोमेथाकझॅम, २५ डब्ल्यू.जी. १ ॲसिडामिप्रिड, २० एस. पी. ५
ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात. हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पिकास फुलकळी येऊ लागतात ५ % निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलेओकील या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची ५०० मि.ली.५०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट, ५ %
एस. जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा क्लोरॅटंरनिली
१८.५ % एस. सी. २.५ मि.ली.प्रति १०लिटर पाणी यापैकी एका रासायनिक कीटकनाशकाची करावी. किडींचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी शेतात पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर किमान ५० पक्षीथांबे लावावेत. यावर कोळसा, चिमण्या, साळुंख्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात.