श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक वतीने उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार,लेखक,छायाचित्रकार यांचे कौतुक
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे शुभहस्ते सन्मान पत्र आणि स्मृतिचिन्ह …
श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक आयोजित पत्रकार दिना निमित्त कै. कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा शुक्रवार दि. ५ जानेवारी २०२४ रोजी श्री कालीका मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यात गोदातीर ईतिहास संशोधनात भरीव योगदान देणारे लेखक, पत्रकार सुशांत घोडके सर यांचा कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे शुभहस्ते विशेष सन्मान देवून गौरवण्यात आले आहे. “उपासनेतील चंद्रावर ‘इस्रो’ यानाचा नवा अध्याय…” या लेखाचा विशेष गौरव करण्यात आला आहे.
श्री कालिका देवी मंदीर संस्थान, नाशिकचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.क्रीडा व युवक सेवा संचनालय, नाशिक विभाग उपसंचालक रविंद्र नाईक हे उपस्थित होते. संस्थानचे खजिनदार सुभाष तळाजिया, सरचिटणीस डॉ. प्रतापराव कोठावळे , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित अशोक दुधारे हे प्रमुख उपस्थितीत होते.उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार व लेखकांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधत सत्कारचे आयोजन केले. यात धुळे ,अहमदनगर , नाशिक ,जळगाव या भागातील प्रत्येक तालुक्यातून एक पत्रकाराची निवड करून त्याने सत्कार केले. यात त्यांना एक सन्मानपत्र ,एक स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले. याचे वितरण जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना भटेवरा यांनी सांगितले की , आजची पत्रकारिता ही आव्हानानी भरलेली आहे. आज मितीला वृत्त संस्थेचे मालकच सरकार व राजकारण्यापुढे लोटांगण घालत आहे. परिणामी खालच्या स्तरावर पत्रकारिता करणारे पत्रकार ,बातमीदार यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून सुशांत घोडके तर राहाता तालुक्यातून मधू ओझा यांचे सह जिल्ह्यातील दत्ता इंगळे , श्रीकांत जाधव, बाळासाहेब नवगिरे ,संदीप गाडेकर आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले .

सुशांत घोडके यांना अनेक वृत्तपत्र, मासिक यामध्ये विशेष लेख प्रसिद्ध झाले आहे.तसेच ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. यात महाराष्ट्र शासनचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (वन विभाग) तसेच ते स्वच्छ भारत अभियान स्वच्छतादूत आहेत.गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद(अहमदनगर जिल्हा शाखा) आणि हबाल रंगभूमी परिषद, प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासन ४८ वा राज्य नाट्य महोत्सव समन्वयक सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले आहे. नाट्य मंदार पुरस्कार : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई, त्यांना कलाउपासक पुरस्कार (कलाध्यापक संघ), समाजरत्न पुरस्कार (जाणता राजा प्रतिष्ठान : भास्कर पेरे पाटील यांचे शुभहस्ते) सन्मानित करण्यात आले असून सूर्यतेज संस्था, कोपरगाव संस्थापक आहेत.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आनंद खरे, अशोक कदम, उदय खरे, दीपक निकम, दीपक पाटील, नितीन हिंगमिरे, राम पाटील, भरत पाटील, राजु शिंदे, शशांक वझे, अविनाश वाघ, अर्जुन वेलजाळी, अविनाश ढोली, ऋषिकेश रसाळ, ज्योती निकम, मनिषा काठे पदाधिकारी व सर्व कार्यकारीणी सदस्य यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन मिलिंद सुगंधी यांनी केले. अमोल जाधव यांचेसह सुमारे शंभर पत्रकारांनी या कार्यक्रमास हजेरी लागावी.