कोपरगांवकर स्वर संगीत मैफीलीत रसिक मंत्रमुग्ध…
महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राच्या गायकांचा उमटला लोकधारेचा स्वर…
अहमदनगर येथील भिस्तबाग महल येथे सुरु असलेले महासंस्कृती महोत्सवात कोपरगांवकर स्वर संगीत मैफीलीत इंडियन आयडल फेम सुरभि कुलकर्णी , सारेगमप लि. चॅम्पस विजेती गौरी पगारे, सारेगमप लि. चॅम्पस उपविजेता जयेश खरे यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकगीते सादर करत रसिक मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, अहमदनगर यांचे वतीने महासंस्कृती महोत्सव सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित कोपरगांवकर स्वर संगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांनी गायलेले “सुर निरागस हो” या गीताने महाराष्ट्राची गायिका सुरभि कुलकर्णी हीने प्रारंभ केला. यानंतर माझ्या राजा रं (गौरी), गाऊ नको रे किसना (जयेश), बहरला हा मधुमास (द्वंद्व सुरभि-जयेश), हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा (सुरभि), बांगड्याची माळ (गौरी), माझी मैना गावाकड राहिली (जयेश), कोळीगीते पॅरडी (सर्व), खंडोबाची कारभारीन (गौरी), आली आली हो गोंधळाला (सुरभि), पोवाडा (प्रतापगड च्या पायथ्याशी खान) (जयेश), कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी (द्वंद्व सुरभि-जयेश), हलगी वाजती (गौरी), कोंबडी पळाली (द्वंद्व गौरी-जयेश), तुझ्या रूपाचं चांदणं (जयेश), चला जेजुरीला जाऊ (सुरभि), कोळीगीत पॅरडी,डोल डोलतंय (जयेश) ,एकविरा आई (गौरी) , वेसावची पारू (जयेश), डोंगराचे आरुन (सुरभि), मी हाय कोली(जयेश) अशी एकापेक्षा एक गीत सादर केली कार्यक्रमाची सांगता जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सामुदायिक गायनाने झाली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शारदा संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. दिपाली कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर, चित्रपट महामंडळाचे शशिकांत नजान यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्वरसंगित यशस्वीतेसाठी शारदा संगीत विद्यालयाचे संचालक केतन कुलकर्णी, राहुल कांबळे, विश्वास खरे आणि वाद्यवृंद यांनी संगीत साथ केली. उपस्थित रसिकांनी दाद देतांना टाळ्या, शिट्ट्या, वन्समोअर यांनी उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.