भाजपा विरुद्ध भाजपा
राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो. संबंध फक्त सत्तेशी असतो . याची प्रचिती जनतेला येत आहे . दररोज राजकारणी आपले बालेकिल्ले मजबूत करण्यासाठी नवनव्या उपायांचा मार्ग अवलांबतो . गेल्या पांच वर्षात विरोधक कुणीही असो , भाजपा त्याला सामावून घेण्यात व्यस्त आहे . परिणामी त्यांचे एकनिष्ट हे आहे तिथे समाधानी आहेत . कारण त्यांचे मार्ग सर्वत्र बंद झाले आहे . अशा परिस्थित आता दोन्ही कॉंग्रेस कडून आयात झालेले राजकारणी जरी भाजपाच्या छताखाली एकत्र असले तरी आपसातील राजकीय विरोध हा किंचितही कमी झालेला नसल्याचे वरचे वर दिसून येत आहे. परिणामी एकमेकाना रोखणे यासाठी ही मंडळी आपली ऊर्जा खर्च करीत आहे.
याचाच एक भाग म्हणजे विवेक कोल्हे यांनी कोपरगावचे लोकप्रतिनिधि आशुतोष काळे व जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष विखे यांचे विरोधात मोठा मोर्चा काढला. या मोर्चाने जावून त्यांनी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयावर काही काळ ठिय्या आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा मार्ग अवलांबला आहे.
राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा राधाकृष्ण विखे यांच्या विजय रथाला ” ब्रेक “लागला. त्यानिवडणुकीच्या निमित्ताने विखे विरोधक एकत्र आले होते. यात भाजपचे निष्टावान ही सहभागी झाले. या सर्वांच नेतृत्व विवेक कोल्हे यांनी केले होते. ही निवडणूक राजकीय पक्ष म्हणून सुरू नसल्याचे कारण पुढे करून विखे सह सर्वानी ही निवडणूक लढवली होती. त्यात विखे पॅनलचा झालेला पराभव हा परिसराचे राजकारणावर बदलनारा ठरला आहे. तेव्हा पासून विखे आणि कोल्हे हे एकमेकांचे राजकीय विरोधक झाले आहे. प्रसंगी एकमेकाला शह काटशह देण्याचे प्रयोग सुरूच आहे. राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री आहेत , पालक मंत्री आहेत . तर स्नेहलता कोल्हे या भाजपच्या कार्यकारणी वर नियुक्त आहे. या निमित्ताने कोल्हे कुटुंबाचे नवे राजकीय वारस हे उदयास येत आहे. यामुळे पारंपरिक राजकारणाला वेगळे वळण मिळत आहे. निवडून येवून पक्ष बदलाच्या बेडूक उड्या मारण्यापेक्षा पक्षात राहूनच थेट विरोध करून सत्तेत येता येते असा हा प्रयोग आहे. असो सत्ता आपल्याच कडे अबाधित राहावी यासाठी सारेच राजकारणी तन मन धनाने प्रयत्न करतात . याला अपवाद सध्यातरी एकही राजकारणी नाही.