वंचित आघाडीची उमेदवार उत्कर्षा रुपवते व मनोज जरांगे पाटलांची भेट 

manoj jarange visit

वंचित आघाडीची उमेदवार उत्कर्षा रुपवते व मनोज जरांगे पाटलांची भेट 

एकीकडे उष्णतेने अवघा राज्य होरपळून निघत आहे. यामुळे निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे कार्यकर्ते सुस्तावले आहे . उन्हाने काहीसे धास्तावले आहे .तरीही लोकसभेचा प्रचार जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदारांपर्यंत कुठलाही नेता अद्याप पोहचला नसल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. अर्थात थेट दहा अकरा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे दिवस नाहीत. मग सभा , लग्न ,  सार्वजनिक कार्यक्रम यांचा आधार घेतला जात आहे .  वंचित ने मात्र समाजावर प्रभाव टाकणारे घटकाना भेटून प्रचाराची दिशा बदलली आहे.

शिर्डी लोकसभा निवडणूक प्रचारात  महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे करीत राज्य मंत्रिमंडळ सक्रिय आहे . तर दुसरीकडे माविआ चे भाऊसाहेब वाकचौरे यांचे करीत  उबाठाने ताकत लावली आहे . भाजपचे कार्यकर्ते येणारे आदेशाच्या प्रतीक्षेत आहे . तर निष्ठावान व नूतन शिवसैनिक आपली निष्ठां सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक भाष्य करून उमेदवारांना उभारी देण्याचं काम करत आहे . या सर्व सावळ्या गोंधळात वंचित आघाडीची उमेदवार उत्कर्षा रुपवते याना समाजाची नस पकडण्यात यश मिळताना दिसत आहे .आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे.  दोन्ही आघाड्यांचे उमेदवार अंतर कलहाला निस्तरण्यात व्यस्त असताना उत्कर्षा रुपावतेंनी मनोज जरांगे पाटलांची घेतलेली भेट हि परिणाम कारक ठरणार आहे . अर्थात त्यांच्या दोघात काय चर्चा झाली हि बाब अजून तरी समोर आलेली नाही . परंतु समाजाच्या सर्व परिणामकारक घटकापर्यंत उत्कर्षा रुपवतेंच पोहचणं दोन मातब्बर उमेदवारासाठी नक्कीच चॅलेंज ठरू शकते. 

महायुती व महा आघाडी दोन्ही उमेदवाराना अंतर कलह डोकेदुखी ठरणार आहे. कधी कार्यकर्त्यांची मनधरणी तर कधी मतदारांची मनधरणी यातच यांची ऊर्जा खर्च होताना दिसत आहे. गावोगावी ठराविक कार्यकर्ते निवडणूक सांभाळून घेतील अशी स्थिति या निवडणुकीत नाही. मुळात स्थानिक कार्यकर्तेच कुणाच्या मागे जावे की ज्याने आपली ससे होळपट होणार नाही याचा निर्णय करू शकत नाहीय. गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडी या जनतेचा मनाचा ठाव न लागू देणाऱ्या आहेत. त्यात पुनः काही काम न केलेले तर थेट पाच वर्षांनी भेटणारे उमेदवार असल्यानेही निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *