वाकचौरे यांच्या प्रचारासाठी उबाठाचे मावळे सरसावले .
शिडी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारांकरिता गावोगावचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. उबाठा सेनेच्या मावळ्यानी मशालीचा प्रचार सुरू केला आहे.
पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी व जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पवार. बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी.यांनी समाजातील युवक मतदार यांच्या वयक्तीक गाठीभेटी घेण्याचा धडका सुरू केला आहे . प्रत्यक्ष उमेदवार हे सभा , रॅली मध्ये व्यस्त आहेत. अशा वेळी सर्वात शेवटच्या कार्यकर्त्यांची ही मोहीम मशाल घरोघरी पोहचविण्यात यशस्वी होत असल्याचे दिसते.

सध्या सत्ताधारी विरोधी पक्षात कार्यकर्ते नसून फक्त नेतेच असल्याने उबाठाची ही प्रचार यंत्रणा महायुतीच्या उमेदवाराला डोकेदुखी ठरत आहे.जसे महायुतीचे उमेदवार मोदीसाठी मते मागत आहे. तसेच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मशाल घरोघरी पोहचविण्याचा विडा उचलला असल्याचे महेश कुलकर्णी यांनी सांगितले आहे. यासोबतच कुलकर्णी म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांना वाढता पाठिंबा.त्याकरिता आम्ही रोज मतदारांपर्यन्त यांचे चिन्ह पोहचवत आहोत. गल्ली गल्ली कोर्नर बैठक घेत आहोत आज स्टेशन रोड येथील चांगदेवनगर रोड हनुमान मंदिराजवळ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांचे मशाल या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करुन प्रचार पत्रके देऊन मतदारांना विंनती करण्यात आली असता.

महेश कुलकर्णी यांनी सांगितले की मशाल या चिन्हावर पुणतांबा परीसरातुन 5000 मताची आघाडी उमेदवार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांना मतदार राजा देणारच आहे .असा विश्वास व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले आहे.