“कापूस पिकासाठी ठिबक सिचंनातून दयावयाच्या पाण्याची गरज”
प्रचलित पध्दतीने पाणी दिल्यास कापसाची खरीप हंगामात पाण्याची एकूण गरज ८० ते ९० सें. मी. एवढी असते. मात्र कापूस पिकास ठिबक सिंचनातून पाणी दिल्यास ४४ ते ४५ सें. मी. एवढीच पाण्याची गरज लागते. याचाच अर्थ असा की कापसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
राहूरी जि. अहमदनगर परिसरासाठी ठिबक सिंचन पध्दतीत कापसाची पाण्याची दररोजची गरज खालीलप्रमाणे असून राज्यातील इतर ठिकाणच्या सरासरी बाष्पीभवनानुसार त्यात कमी जास्त बदल होवू शकतो.
जून महिन्यात कापसाचा पीक गुणांक ०.७५ व दिवसाचे सरासरी बाष्पीभवन ८.१६ मि. मी. गृहित धरुन कापूस पिकाच्या प्रत्येक झाडाची पाण्याची दररोजची गरज केवळ २.३० लिटर एवढी असते. त्यानुसार ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेल्या एक हेक्टर कापसाची जून महिन्यात दररोजची पाण्याची गरज २८४०० लिटर असते.
जुलै महिन्यात कापसाचा पीक गुणांक ०.८० व दिवसाचे सरासरी बाष्पीभवन ५.९२ मि. मी. गृहित धरुन कापूस पिकाच्या प्रत्येक झाडाची पाण्याची दररोजची गरज केवळ १.८० लिटर एवढी असते. त्यानुसार ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेल्या एक हेक्टर कापसाची जुलै महिन्यात दररोजची पाण्याची गरज २२२०० लिटर असते.
ऑगस्ट महिन्यात कापसाचा पीक गुणांक १.०५ व दिवसाचे सरासरी बाष्पीभवन ४.७१ मि. मी. गृहित धरुन कापूस पिकाच्या प्रत्येक झाडाची पाण्याची दररोजची गरज केवळ ४.७१ लिटर एवढी येते. त्यानुसार ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेल्या एक हेक्टरकापसाची ऑगस्ट महिन्यात दररोजची पाण्याची गरज २३४५० लिटर असते.
सप्टेंबर महिन्यात कापसाचा पीक गुणांक १.२५ व दिवसाचे सरासरी बाष्पीभवन ४.८५ मि. मी. गृहित धरुन कापूस पिकाच्या प्रत्येक झाडाची पाण्याची दररोजची गरज केवळ ४.८५ लिटर एवढी असते. त्यानुसार ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेल्या एक हेक्टर कापसाची सप्टेंबर महिन्यात दररोजची पाण्याची गरज ३३४५० लिटर असते.
आक्टोबर महिन्यात कापसाचा पीक गुणांक ०.८० व दिवसाचे सरासरी बाष्पीभवन ५.३५ मि. मी. गृहित धरुन कापूस पिकाच्या प्रत्येक झाडाची पाण्याची दररोजची गरज केवळ ५.३५ लिटर एवढी असते. त्यानुसार ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेल्या एक हेक्टर कापसाची आक्टोबर महिन्यात दररोजची पाण्याची गरज २०००० लिटर असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .