पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा: दत्ता गायकवाड
सार्वजनिक मंडळे, मित्रपरिवारातर्फे १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
नाशिकरोड: शहरात सिमेंट काँक्रिटचे जंगल वाढत आहे. त्यामुळे झाडे कमी झाली असून पर्यावरणाचे संतुलन ढासळले आहे. पर्यावरण संतुलन राखायचे असेल तर झाडे लावली पाहिजे, तसेच ती जगवली पाहिजे, त्यांचे संगोपन करण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे असे, आवाहन ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांनी आज येथे केले.

जेलरोड येथील रामेश्वरनगरमध्ये १० हजार वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मनपाचे अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मानवाचे निसर्गावर अतिक्रमण बिनधोकपणे सुरू आहे. आपल्या स्वार्थासाठी डोंगरे पोखरली जात आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जात असून शहरात सिमेंटची जंगले वाढत आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, वाढता उन्हाचा कडाका, कधी कोरडा तर कुठे ओला दुष्काळ अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांची मालिका कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळते.
याच अनुषगाने स्थानिक मित्रमंडळ, सामजिक, राजकीय अशा सर्वांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात १० हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सातत्याने ३ वर्ष या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. तसेच ज्या नागरिकांना या वृक्ष लागवड अभियानात सहभाग घ्यायचा आहे. त्यांना लागवडीसाठी वृक्ष उपलब्ध करुन देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी मनपा उपायुक्त विवेक भदाने, अतिरिक्त आयुक्त मनपा प्रदीप चौधरी, उद्यान निरीक्षक सचिन देवरे, ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, दिनकर आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेविका मंगला आढाव, संतोष पिल्ले, सचिन पवार, धनंजय लोखंडे, सचिन देसले, सागर भोजने, तुषार वाघमारे, प्रवीण पवार, गोरख चकोर, गोपी साळी, राजेंद्र दुसाने,आशुतोष आरोटे, शिवम आढाव, शाम महाले, नितीन थोरात जितू पोद्दार, दिलीप आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.