पंतप्रधानपदी मोदींची हॅट्रिक
महाराष्ट्राच्या ६ शिलेदारांनी घेतली शपथ
नवी दिल्ली: मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६९ जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश होता. या शपथग्रहण सोहळ्यासाठी देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते.





आज राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक समारंभात केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयल, रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळाली तर रक्षा खडसे, मुरलीधर मोहोल आणि प्रतापराव जाधव या नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. मात्र नारायण राणे आणि भागवत कराड यांचा पत्ता साफ झाला आहे.
रक्षा खडसेच्या यांना मंत्रिपद मिळणे ,हा भाग त्यांच्या स्वतः च्या कर्तुत्वाशी निगडीत आहे. तरीही नाथाभाऊ हे स्वगृही परतण्याचा मार्ग या मंत्रीपदाच्या मार्गावरून जातो हे नक्की .