ग्रामीण भागातली महसुली व्यवस्था
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे कार्यवाही करणार ?
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात असलेल्या तलाठी कार्यालयात नियुक्तीला असलेले कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नाही. यातून नागरिकांचे होणारे हाल याची गंभीरतेने दाखल घेणारी रचना नसल्याने ही व्यवस्था मनमानी करीत आहे. विशेष म्हणजे नियुक्तीच्या जागी निवास करावा यासाठी शासनाने अनेक आदेश दिलेले आहेत. त्या आदेशावर राज्याच्या महसूल विभागासह अन्य सरकारी विभागांनी एक पळवाट शोधली आहे. ती म्हणजे या कर्मचाऱ्यांना आणखी एखाद्या गावचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.
वास्तविक पाहता हे कर्मचारी खरोखर त्यांच्या नियुक्तीच्या गावी जातात की नाही याची पडताळणी करण्याची व्यवस्था नाही. तशी जबाबदारी घेणे तहसीलदार किंवा विभाग प्रमुख अधिकारी निभावताना दिसत नाही. याशिवाय गावचे तलाठी , मंडल अधिकारी , ग्रामसेवक , दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी हे नियुक्तीच्या ठिकाणांपेक्षा तालुक्याच्या ठिकाणी बैठक , मीटिंग यात तैनात असल्याने नागरिकांची कामे रखडत आहे याकडे अधिकारी यंत्रणा ही नेहमीच दुर्लक्ष करीत आली आहे. इकडे लोकांचा दिवस वाया जात आहे. त्याची भरपाई कोण देणार ,या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? हा प्रकार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे तालुक्यातील आहे. क्रांतिकारी शेतकरी संप पुकारलेल्या पुणतांबा गावचा आहे.
या सर्व गलथान कार्यपद्धतीचा नगरिकाना कसा त्रास होतो याच वास्तव दाखवणारे हे विडिओ बघा. जमल तर योग्य ती कार्यवाही करा. कारण जो पर्यन्त जनतेला ही व्यवस्था आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. त्यांच्या या अधिकाराची जाणीव होत नाही तो पर्यन्त चालु मनमानी.