फटाक्यांच्या कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट
सोलापूर ब्यूरो : सोलापूरच्या जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या धारी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला असून, सुदैवाने जीवित हानी टळली .
वटपौर्णिमेच्या सुट्टीमुळे आज कारखान्यात एकही कामगार उपस्थित नव्हते. वेळीच अग्निशमन गाड्या धावून आल्याने आग आटोक्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून पुढील तपास सुरू आहे.या अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसर हदरून गेला होता. बार्शी पोलिसानी व अग्निशमन दलाची कुमक यांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल धाव घेतली .
एरवी या फटका कारखान्यात सुमारे पंचवीस ते तीस मंजूर काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुदैवाने आज सर्वाना सुट्टी होती. व या परिसरात कुणीच नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.