ग्रामसभेत कळीच्या मुद्द्यावर चर्चा होवू न देण्यात सत्ताधारी यशस्वी.
सरकारी कर्मचारी, अधिकारी गैरहजर यावरून ग्रामस्थ संतप्त ,पुन्हा एकदा ग्रामसभेत दारूचा मुद्दा
पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसभा दिनांक 28 रोजी पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली या ग्रामसभेत वाड्या वस्त्यवरील रस्त्याची अवस्था तर अधिकारी गैरहजर यावरून ग्रामस्थ संतप्त झाले तर पुन्हा एकदा ग्रामसभेत दारूचा मुद्दा उपस्थित होऊन शेवटी निर्णय मतदान घेऊन देण्याचे ठरविण्यात आले.पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत ग्रामसभा सुरवातीला कोरम अभावी तहकूब करण्यात आली.ग्रामसभा तहकूब करून एक तास नंतर अध्यक्ष म्हणून पुणतांबा ग्रामपंचायत सरपंच निवड करून ग्रामसभा सुरू करण्यात आली.
मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचताना गावातील ग्रामस्थांनी सरकारी अधिकारी कोण कोण हजर आहेत याचा सुरवातीला आढावा घ्या आणि जर अधिकारी गैरहजर असतील तर ग्रामसभा घेऊ नये असा पवित्रा घेत गोंधळला सुरुवात झाली.हे मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचत आहे.आपले जे काही म्हणणे आहे ते प्रत्येकानी प्रश्न मांडून सोडवू असे अध्यक्षांनी सांगितले तर महसूल विभाग तलाठी,मंडळ अधिकारी,उशिरा आलेले पोलीस अधिकारी,सत्ताधारी,विरोधकातील काही सदस्य गैर हजर असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.जे अधिकारी ग्रामसभेला गैरहजर आहेत त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली.
मागील ग्रामसभेत देशी दारू दुकान ना हरकत,तर बियर शॉप हरकत असे दोन निर्णय का यावरून ग्रामस्थ आणि सदस्य यांच्या वाद झाला असता उपसरपंच या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी मतदान प्रकिया करूनच ग्रामसभा दारू दुकान बियर शॉप परवानगी देईल तर मागील ग्रामसभेत दिलेली परवानगी नाकारत असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.या दारूच्या विषयावरून ग्रामसभेत दोन गट पडल्याचे दिसून आले.यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुहास वहाडणे यांनी या संवेदनशील विषयात कुणावर भेदभाव करून चालणार नाही. तसेच याबाबत ना हरकत द्यायची असल्यास सर्वाना द्या. नाहीतर कुणालाच देवू नका.
तर पुणतांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना निधी उपलब्ध होताच सी सी टिव्ही देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.गावातील मंदिरे,शाळेचा मैदाने हे सध्या मदयपींचे अड्डे झाल्याने मुलांना मैदानावर खेळताना या टाकलेल्या रिकाम्या बाटल्या मुळे इजा होऊ शकते ही तक्रार या ग्रामसभेत उपस्थित झाली ,तसेच न्यू इंग्लिश स्कूल परिसरात शालेय विद्यार्थिनींना रोड रोमियोंचा त्रास सहन करावा लागतोय. याबाबत स्थानिक पोलीस हे तक्रार येण्याची वाट पाहत आहेत. या गोष्टीनी संतप्त झालेल्या उप सरपंच निकिता जाधव यांनी त्याची तक्रार ग्रामपंचायत मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना करणार असल्याचे सांगितले.
आजच्या ग्रामसभेत खास गोंधळ घालण्यासाठी व प्रमुख कळीच्या मुद्यावरील लक्ष हटविण्यासाठी चढाओढ सुरू होती. फुटकळ मुद्द्यावर गोंधळ सुरू आहे. हे पाहून ज्याना प्रश्न मांडायचे होते , ते न मांडताच नागरिक ग्रामसभेतून निघून गेले. या गलथानपणावर चांगला उपाय न सुचल्याने ज्या ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कर भरलेले असेल त्यांनीच प्रश्न विचारावे असा तुघलकी ठराव घेण्यात आला.रेल्वे प्रशासनाच्या मुजोरी विरोधात आता यापुढे त्यांच्या कोणत्याच बाबीकरीता ग्रामपंचायत मंजुरी,किंवा परवानग्या देऊ नयेत असा ठराव घेण्यात आल.या ग्रामसभेत सर्व अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,जनावराचे वैद्यकीय अधिकारी,वीज वितरण अधिकारी,शाळांचे मुख्याध्यापक,लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.