पुणतांबा रेल रोकोचे परिणाम दिसू लागले .
तरीही रेल्वे थांबविण्याच्या बाबतीत प्रशासन अजूनही तळ्यात मळ्यात .
रेल्वे प्रशासनांशी संबंध असलेल्या अनेक अडचणी व रेल्वे ने अचानक बंद केलेले रेल्वे थांबे , यांना कंटाळून पुणतांबा ग्रामस्थानी स्वयंस्पूर्तीने रेल रोको केला. त्यात जवळपास पाच हजार नागरिक सहभागी झाली. यावेळी देण्यात आलेले आश्वासन अजून लालफितीत अडकलेले दिसत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकाच्या कार्यालयात ग्रामस्थांच्या शिष्ट मंडळाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला एकवीस ग्रामस्थ गेले होते.
ही बैठक पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे यांनी आयोजित केली होती. पण त्या दिवशी त्या परगावी निघून गेल्याने उप विभागीय व्यवस्थापक ब्रिजेश सिंग यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यात त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यावर काम सुरू झाले आहे. लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. असे आश्वासन दिले होते. परिणामी काल त्यांनी पुणतांबा ग्रामस्थांच्या मागणीवर काय कार्यवाही सुरू करण्यात आली त्याचा लेखी खुलासा केला आहे. तसा मेल ग्रामपंचायतीला पाठवण्यात आला आहे. यावरून पुणतांबा व परिसरातील ग्रामस्थान नव्याने आंदोलन करण्याची गरज पडणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान रेल रोकोच्या दिवशी ग्रामस्थाना ज्या रेल्वेला पुणतांबा जंक्शन वर थांबे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यातली एकही रेल्वे इथे थांबायला सुरुवात झालेली नाही. याबाबत खालच्या व वरिष्ठ कार्यालयात असमन्वय असल्याचे दिसून येते. आंदोलनाच्या दिवशी खुद इंदु दुबे यांनी अमरावती पुणे , नागपूर कोल्हापूर येणारी व जाणारी , तसेच साईनगर दादर ही आठवड्यात तीन दिवस जाणारी एक्सप्रेस या पाच गाड्यांना पुणतांबा जंक्शन वर थांबेल असे सांगितले होते. त्याबाबत खालच्या स्तरावर म्हणजेच स्टेशन मास्तर , वाणिज्य अधिकारी यांना अद्यापही तांत्रिक थांब्यांचे आदेश दिले नसल्याचे कळते.