“जमीन सपाटीकरण करून करा पाण्याचा कार्यक्षम वापर”
खरीप हंगामादरम्यान पावसाच्या स्वरूपात जमिनीत मुरलेले पाणी रब्बी हंगामात घेतलेल्या पिकांसाठी जमिनीतील ओल उपयोगात आणून किंवा पाटपाण्यावर अथवा विहिरी /कुपनलिकेच्या पाण्याने ओलीत करून रब्बी पिके घेतली जातात. प्रवाही सिंचन पद्धतीत पाण्याची कार्यक्षमता ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसते. कार्यक्षमता कमी असण्याची निरनिराळे कारणे आहेत. त्यापैकी जमिनीस पाणी देताना योग्य प्रमाणात उतार नसणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
पिकास दिलेल्या पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जमीन समपातळी किंवा सपाट असण्याबरोबरच तिला ठराविक दिशेने योग्य प्रमाणात उतार असणेही गरजेचे असते. ज्या जमिनी उंच, खोल किंवा अति उताराच्या असतात त्या जमिनीत पिकास सारख्या प्रमाणात पाणी बसत नाही. अशा जमिनीत उंचवट्याच्या जागी पाणी पोहोचत नाही तर खोल अथवा सखल भागातील पिके अति पाण्याने पिवळी पडतात. जमिनीस प्रमाणापेक्षा जास्त उतार असेल तर साऱ्यात, सऱ्यात किंवा वाफ्यात दिलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहून जाते. सऱ्यांचे किंवा वाफयांचे फूट तुटीचे प्रमाण वाढते आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊन जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत साऱ्यांच्या, स-यांच्या
किंवा वाफ्यांच्या सुरुवातीला कमी पाणी उपलब्ध होते आणि शेवटच्या भागात पाण्याची साठवण होऊन पाणी जरुरीपेक्षा जास्त खोलीवर मुरते. पाणी कार्यक्षम मुळांच्या खोलीपेक्षा जास्त खोल मूरते त्यामुळे पाण्याचा तर अपव्यय होतोच, त्याचबरोबर खतांचाही नाश होतो. एकंदरीत पाणी सर्व ठिकाणी समप्रमाणात बसत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच पिकाची उगवण सारख्या प्रमाणात होत नाही तसेच पुढे पिकाची वाढ ही कमी जास्त प्रमाणात होते.
याउलट जमीन एकदम सपाट असेल, तिला कोणत्याही दिशेने अजिबात उतार नसेल, तरीही अशा जमिनीस पाणी योग्य तऱ्हेने देता येत नाही कारण पाणी देत असताना जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्यांच्या, स-यांच्या किंवा वाफ्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जमिनीस विशिष्ट प्रमाणात उतार आवश्यक असतो. जमिनीस अजिबात उतार नसेल तर पाणी पुढे सरकण्याची गती अतिशय मंद होते आणि पाणी जमिनीत जरुरीपेक्षा जास्त खोल मुरते, परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उंच, सखल अथवा अति उताराच्या जमिनीचे सपाटीकरण करून जमिनीस ठराविक दिशेने योग्य उतार देणे आवश्यक असते.
डम्पी लेव्हलच्या साह्याने जमिनीच्या पृष्ठभागाचा समपातळीत नकाशा तयार करून त्या नकाशावर जमिनीत सध्या असलेले बांध, रस्ते, विहिरी, नाले इत्यादींचा समावेश करून या नकाशाच्या आधाराने जमिनीचा उभा-आडवा उतार, खड्डे, टेकड्या, ओढे, नाले, इत्यादी गोष्टी लक्षात येतात. समपातळी नकाशाच्या आधाराने शेतातील पाण्याच्या पाटाचा मार्ग व पाणी देण्याची दिशा ठरवता येते, तसेच जमिनीचे सपाटीकरण करताना शेतात शेताच्या उताराच्या दृष्टीने उपविभागाची लांबी व रुंदी नेमकी किती ठेवावी, शेतात रस्ता व चर कोठे ठेवावेत, या गोष्टींची शास्त्रशुद्धरित्या आखणी करता येते. जमिनीच्या सपाटीकरणाच्या बाबतच्या महत्त्वाच्या बाबीः ज्या जमिनीचे सपाटीकरण करावयाचे आहे त्या जमिनीच्या समपातळी नकाशाच्या आधारे क्षेत्रावर १०-१०, १५-१५ किंवा ३०-३० मीटरवर पातळ्या दयाव्यात. जमिनीच्या सपाटीकरण्यासाठी लागणारी कटाई किंवा भराई करण्यासाठी प्रथम समपातळी नकाशा व जमिनीच्या क्षेत्रामध्ये सर्व बिंदूंच्या पातळ्यांची बेरीज करून सरासरी काढावी व नंतर क्षेत्राचा मध्यबिंदू काढावा.जमीन सपाटीकरण करून करा पाण्याचा कार्यक्षम वापर खरीप हंगामा दरम्यान पावसाच्या स्वरूपात जमिनीत मुरलेले पाणी रब्बी हंगामात घेतलेल्या पिकांसाठी जमिनीत ओल उपयोगात आणून किंवा पाठ पाण्यावर अथवा विहिरी कुपनलिकेच्या पाण्याने ओलीत करून रब्बी पिके घेतली जातात प्रवाही सिंचन पद्धतीत पाण्याची कार्यक्षमता 30 ते 35 टक्क्यांपेक्षा जास्त नाही कार्यक्षमता कमी असण्याची निरनिराळे कारणे आहेत त्यापैकी जमिनीस पाणी देताना योग्य प्रमाणात उतार नसणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे विकास दिलेल्या पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जमीन समपातळीच किंवा सपाट असण्याबरोबरच तिला ठराविक दिशेने योग्य प्रमाणात उतार असणे ही गरजेचे असते ज्या जमिनी उंच खोल किंवा अतिउताराच्या असतात त्या जमिनीत विकास सारख्या प्रमाणात पाणी बसत नाही अशा जमिनीत उंचवट्याच्या जागी पाणी पोहोचत नाही तर खोल अथवा सखल भागातील पिके आती पाण्याने पिवळी पडतात जमिनीस प्रमाणापेक्षा जास्त उतार असेल तर साऱ्यात सऱ्यात किंवा वाफ्यात दिलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहून जाते सऱ्यांचे किंवा वाफ यांचे फूट तुटीचे प्रमाण वाढते आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्य होऊन जमिनीची धूपही होते अशा परिस्थितीत साऱ्यांच्या सरांच्या किंवा वाफ्यांच्या सुरुवातीला कमी पाणी उपलब्ध होते आणि शेवटच्या भागात पाण्याची साठवण होऊन पाणी जरुरी पेक्षा जास्त खोलीवर मुरते पाणी कार्यक्षम मुळांच्या खोलीपेक्षा जास्त खोल मूर्ती त्यामुळे पाण्याचा तर आपावय होतोच त्याचबरोबर खतांचाही नाश होतो एकंदरीत पाणी सर्व ठिकाणी समप्रमाणात बसत नाही त्यामुळे सुरुवातीलाच पिकाची उगवण सारख्या प्रमाणात होत नाही तसेच पुढे पिकाची वाढ ही कमी जास्त प्रमाणात होते याउलट जमीन एकदम सपाट असेल तिला कोणत्याही दिशेने अजिबात उतार नसेल तरीही अशा जमिनीस पाणी योग्य तऱ्हेने देता येत नाही कारण पाणी देत असताना जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्यांच्या सरांच्या किंवा वाफ्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जमिनीस विशिष्ट प्रमाणात उतार आवश्यक असतो जमिनीस अजिबात उतार नसेल तर पाणी पुढे सरकण्याची गती अतिशय मंद होते आणि पाणी जमिनीत जरुरी पेक्षा जास्त खोल मुरते परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्य होतो म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उंच सखल अथवा अतिउताराच्या जमिनीचे सपाटीकरण करून जमिनीस ठराविक दिशेने योग्य उतार देणे आवश्यक असते डम्पी लेवलच्या साह्याने जमिनीच्या पृष्ठभागाचा समपातळीत नकाशा तयार करून त्या नकाशावर जमिनीत सध्या असलेले बांध रस्ते विहिरी नाले इत्यादींचा समावेश करून या नकाशाच्या आधाराने जमिनीचा उभा आडवा उतार खड्डे टेकड्या पुढे नाले इत्यादी गोष्टी लक्षात येतात सम पातळी नकाशाच्या आधाराने शेतातील पाण्याच्या पाटाचा मार्ग व पाणी देण्याची दिशा ठरवता येते तसेच जमिनीचे सपाटीकरण करताना शेतात शेताच्या उताराच्या दृष्टीने उपविभागाची लांबी व रुंदी नेमकी किती ठेवावी शेतात रस्ता व चर कोठे ठेवावेत या गोष्टींची शास्त्रशुद्धरित्या आखणी करता येते जमिनीच्या सपाटीकरणाच्या बाबतच्या महत्त्वाच्या बाबी ज्या जमिनीचे सपाटीकरण करावयाचे आहे त्या जमिनीच्या समपातळी नकाशाच्या आधारे क्षेत्रावर दहा दहा पंधरा किंवा तीस तीस मीटरवर पातळ्या घ्याव्यात जमिनीच्या सपाटी करण्यासाठी लागणारी कटाई किंवा भराई करण्यासाठी प्रथम समपातळी नकाशा व जमिनीच्या क्षेत्रामध्ये सर्व बिंदूंच्या पातळ्यांची बेरीज करून सरासरी काढावी व नंतर क्षेत्राचा मध्यबिंदू काढावा. क्षेत्र जर आयाताकृती किंवा चौकोनी असेल तर क्षेत्राचे दोन्ही कर्ण एकमेकास जेथे छेदतील तो त्या क्षेत्राचा मध्यबिंदू समजावा व त्याची पातळी एकूण क्षेत्राच्या सरासरी पातळीपेक्षा एक ते दोन सेंटीमीटर जास्त दाखवावी. नंतर जेवढ्या प्रमाणात उतार ठेवायचा असेल त्या प्रमाणात चढाच्या बाजूने प्रत्येक बिंदूच्या लेव्हल्स वाढवत जाव्यात व उताराच्या दिशेने कमी कराव्यात यालाच रचलेली पातळी असे संबोधतात. मुळची पातळी व रचलेली पातळी यांची वजाबाकी करून सपाटीकरणासाठी करावी लागणारी कटाई किंवा भराई काढता येते.
कटाईःभराईचे गुणोत्तर नेहमी एक पेक्षा जास्त येईल हे पाहावे. प्रत्यक्ष सपाटीकरण करताना रचलेल्या पातळ्या काढलेल्या जागी खुंट्या ठोकून त्या खुंट्यावर कटाई किंवा भराई किती करावयची आहे याबाबतच्या खुणा कराव्यात.
सपाटीकरण करताना एक महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची खोली. उथळ जमिनीत जास्त माती उचलून चालत नाही, कारण त्यामुळे खालचा कठीण थर उघडा पडण्याची शक्यता असते. कधीकधी वरचा सुपीक थर जमीन सपाटीकरणात खाली जाऊन खालचा नापिक थर वर येण्याची शक्यता असते, त्यामुळे जमिनीवरील सुपीक थर एका ठिकाणी जमा करून नंतरच सपाटीकरण करणे योग्य ठरते. मात्र सपाटीकरणानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन एका ठिकाणी जमा केलेली सुपीक थराची माती सर्व ठिकाणी समप्रमाणात पसरविणे गरजेचे असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत.