संदीप वर्पे यांची प्रचारात मुसंडी , खोट्या विकासाचा बुरखा फाडला .
कोपरगाव मतदार संघात निवडणूकित रंगत वाढू लागली आहे . महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहे. सत्तेतील वास्तव जनतेसमोर उघड होण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी कोपरगावात झालेल्या प्रचार सभेत मतदार संघात झालेल्या विकास कामातील पाच नंबर तलावाचे पाठपुराव्याचे वास्तव जाहीर सभेत मांडल्याने मतदार चांगलेच आकर्षित झाले आहे.

कोपरगावच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी संदीप वर्पे यांनी आपल्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले प्रतिस्पर्धी संजय काळे याच्या योगदानाचा उल्लेख करून संदीप वर्पे यांनी मतदारांचे मन जिंकले आहे. यासोबत राजेश मंटाला सह स्वतः केलेल्या पाठपुराव्याचा कागदोपत्री असलेला पुरवाच सादर केल्याने सत्ताधारी उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा मुद्दाच खोडला आहे.
संदीप वर्पे यांच्या प्रचार सभेला सुरुवात झाली यावेळी कोपरगाव येथील उद्धव ठाकरे गट शिवसेना राजेंद्र झावारे , कॉँग्रेसचे नितीन शिंदे यांचे सह राष्ट्रवादी शरद पवार गट अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.