शिर्डी विधानसभा खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर
शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.
शिर्डी विधानसभेत प्रथम तपासणी १० नोव्हेंबर, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर व तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते १.३० वाजे दरम्यान होणार आहे. उमेदवारांनी तपासणीपूर्वी निवडणूक खर्च नोंदवही भाग ए.बी.सी परिपूर्ण भरावेत. दैनंदिन खर्च नोंदवही रजिस्टरमधील जमा व खर्च बिलांच्या सत्य प्रती व उमेदवाराचे बॅंक खाते स्टेटमेंट जमा करावेत. उमेदवार व सहायक खर्च निवडणूक निरीक्षक यांच्यात खर्च ताळमेळ घेण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी ११ वाजता राहाता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उमेदवार खर्च तपासणी पथकात सहायक खर्च निरीक्षक मयांक जोशी, उपकोषागार अधिकारी आर.एस.राहिंज, लेखाधिकारी ए.बी.कोल्हे, सुभाष मोरे काम करित आहेत.
(जीमका ,शिर्डी )