सोशल मीडिया पत्रकारिता
आजचा हा सोशल मीडिया व्हायरल थोडा वेगळा आहे. सर्व समावेशक असा विचार करायला भाग पडणारा आहे. अशा घटना या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. तरीही हा व्हायरल खास आहे.
राज्याच्या सरकारात बसलेल्या लोकाना विचार करायला भाग पडणारा आहे. दर दिवशी शाळकरी , महाविद्यालयाच्या मुली,महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडतात. या घडू नये म्हणून मुंबईकरांनी बस मधली एक बाजू महिलांची करून घेतली आहे. तस राज्यभर होणार नाही. रेल्वेत महिलांसाठी स्वतंत्र कोच असतो.
राज्य सरकारने या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढून या घटनाना थांबवणे अपेक्षित आहे. त्यासाठी सरळ पिंक बस सुरू करा. त्यात सर्व महिला प्रवास करतील. त्यात पुरुष कधीही बसणार नाही. मग असे दारुडे यांना अशी संधि मिळणार नाही. या पिंक बस बाबतचा आराखडा Teatimenewsच्या संपादक यांनी राज्य सरकारला देवून बारा वर्ष झाले आहेत.