भारत ही एक महाशक्ती आहे. पश्चिमेकडच्या संपूर्ण जगापेक्षा ही आपला देश मोठा आहे. लोकांची शक्ति मोठी आहे. हा एक विडिओ पहिला की आपण महाशक्ती ,प्रगतशील राष्ट आहोत याबाबत शंका निर्माण होते. ही पोस्ट व त्यावर teatimenews ची प्रतिक्रिया गडकरी यांना समर्पित करण्याचा हेतु इतकाच आहे. की त्यांच्या कडे परिवहन खाते आहे. राष्ट्रीय रस्ते आहे. रस्ते बांधणीच्या बाबत त्यांचे काम हे केंद्रातल्या सरकारला जीवदान देणारी संजीवनी आहे. आणि हे एकमेव मंत्री आहेत की ज्यांना देशाच्या जनतेला विकासाचा अनुभव करून देण्याचे प्रयत्नात सातत्य आहे.
गडकरी यांनी परिवहन विभागात डिजिटलायजेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून घरबसल्या तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळणे , हा परवाना नूतनीकरण घरबसल्या करण्याचा असफल प्रयत्न केला. असफल यासाठी म्हणतो की तुम्ही नूतणीकरणाची फी ऑनलाइन भरू शकता पण ती पावती दाखविण्यासाठी तुम्हाला समक्ष आर टी ओ ऑफिसात जावेच लागते. तर वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी इथे जाण्याची गरज नसल्याचे स्वप्न जनतेला दाखवले.दुर्दैवाने वाहन परवाना काढण्याचे संपूर्ण देशात एकही केंद्र कार्यान्वित झालेले नाही.
आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. पण वास्तव फार वेगळे आहे. राज्यभर नाही तर देशभरच्या पोलिस ठण्यान्याच्या आवारात बेवारस दुचाकी , चारचाकी लाखों वाहने धूळ खात पडलेली देशातील जनतेला पाहायला मिळतात. याबाबत यांचे पोलिस आणि परिवहन विभाग नेमके काय काम करतात किंवा तपास करतात हे फक्त त्याच अधिकारी आणि कर्मचारी यांना माहीत आहे. इतकी जागरूक व्यवस्था आम्ही देशवासीयांनी स्वीकारली आहे. अशावेळी तुमच्या या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा प्रयोग काय दिवे लावणार आहे. याच उत्तर तुम्हीच शोधा.
असो ही व्हायरल पोस्ट बघा. भारतीय नागरिक असा वाहन परवाना नूतनीकरण कधी करू शकतील याबाबत काही खुलासा करता आला तर बर होईल.
विदेश में ड्राइविंग लाइसेंस रिन्यू कराने की ये कितनी आसान प्रक्रिया है,
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) March 28, 2025
लेकिन सोचो अगर आप भारत में ड्राइविंग लाइसेंस रिन्यू कराने चले जाए तो आपको कितना चक्कर काटना पड़ेगा। pic.twitter.com/SDn2Ma8XIt