देवाभाऊ , तुमच्या होमग्राऊंड वरच ऑनलाइन सत्य
देवेंद्र फडणवीस एक अभ्यासपूर्ण ,हजरजबाबी ,विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून देशभर परिचित आहे. अशी व्यक्ति राज्याचे मुख्यमंत्री आहे. नागरी सेवा ऑन लाइन सेवा व्हाव्या म्हणून ते प्रयत्नशील आहे. पण दुर्दैव कामचुकार व्यवस्थेच्या भरवंशयावर ही घोषणा वास्तवात उतरवण्याचे दुष्परिणाम हे जनतेला भोगावे लागतील आणि आजही जनता ते भोगत आहे. हे तुमची पहिल्या टर्म मध्ये सुरू केलेले आपले सरकार पोर्टलवरच्या आजही प्रलंबित असलेल्या तक्रारीची संख्या बघा तुम्हाला धक्का बसेल.
तुमच्या होमग्राऊंड म्हणजेच मुख्यमंत्री ,मुख्य सचिव ,कार्यालयातील ऑनलाइन कार्यपद्धतीचा एक नमूना तुमच्यासह TeaTimeNewsच्या वाचका समोर ठेवतो आहे. मी स्वत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत मेल आई डी वर पाठवलेल्या मेलवर झालेल्या कार्यवाही किवा या कार्यालयाला सादर केलेल्या अहवालाची माहिती मिळविण्यासाठी मी प्रयत्न केला. मला कुठलेही उत्तर मिळाले नाही.माझ्या तक्रारीचे निवारण देखील झाले नाही.
मुख्यमंत्री कार्यालयात मेल पोहचला , तो संबंधित सचिवकडे पुढे फोरवॉर्ड करण्यात आला त्याची ही पीडीएफ


देशातली सर्वोच्च परीक्षा पास अधिकारी ” लोकसेवक ” या व्याखेला कसा हरताळ फसतात ते यातल्या अधोरेखित केलेल्या तारखेवरुन येतो. या कार्यपद्धतीला कंटाळून मी माझ्या अर्जावर झालेल्या कार्यवाहिचा अहवाल माहिती अधिकारात मागितला. त्यांच उत्तर पाहून आपली व्यवस्था ही नेमकी कुणासाठी काम करते असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
माहिती अधिकारात मला आलेल उत्तर :

देवाभाऊ , तुमच्या या टीमेच्या भरवशावर तुमचे ऑनलाइन सेवा पुरविण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल . माझ्या पंधरा वर्षांच्या संघर्षात मला जे अनुभव आले आहेत. त्यावरून मी निश्चितपणे हे सांगू शकतो की , तुम्ही नवीन काही करा नाहीतर नका करू. पण आमच्या अधिकारी ,कर्मचारी ,प्रशासकीय यंत्रणेकरिता जबाबदारी निश्चितीचा कायदा जरूर करा.
आजच वास्तव किती तरी वेगळ आहे. याची खात्री करायची असेल तर तुम्ही फक्त लग्न झालेल्या मुलींचे नाव आई वडिलांच्या शिधा पत्रिकेतून तिच्या सासरच्या शिधा पत्रिकेत किती महिन्यात जाते याची माहिती पुरवठा विभागाकडून घ्या. कि जी प्रक्रिया ऑनलाइन आहे. एका क्लिक वर फार तर तास भरात पूर्ण होणारी आहे. या सध्या सरळ प्रक्रियेला दोन ते तीन महीने लागतात.तुमच्या अनुलोम कार्यकर्त्याला विचारा तो सांगेल तुम्हाला पुरवठा अधिकारी कसा छळतो जनतेला ते.