बिबटे नरभक्षी का होत आहे ,मुख्य समस्येवर कधी लक्ष देणार ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, पाथर्डी, पारनेर, नेवासे, राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे आणि त्यामुळे ऊस तोडणीच्या हंगामाला मोठा फटका बसत आहे. बिबट्याने ऊस तोडणी कामगारांवर आणि ग्रामस्थांवर हल्ले केले आहेत, त्यामुळे अनेक गावात सायंकाळी सातनंतर घराबाहेर कोणी पडत नाही.
अलीकडे बिबटे मानव वस्तीत मुक्त संचार करू लागले आहे. हे चित्र राज्यभर आहे . तरीही अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात एक पाठोपाठ दोन घटनेत एक चिमूरडी तर दुसरी घटनेत एक महिलेचा बळी घेतला आहे.
या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जाता आहे. दुसऱ्या घटनेनंतर कोपरगावचे लोकप्रतिनिधि आशुतोष काळे यांनी थेट उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क केला. परिणामी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नरभक्षी बिबट्याला मारण्याचा प्रस्ताव तयार करावा लागला आहे.
आजमितीला जिल्ह्यात नेमके किती बिबटे आहे. याची आकडेवारी ही अंदाजित आहे. त्यातले नेमके कोणते नरभक्षी झालेले आहेत हे निश्चित करणे कठीण आहे. कोपरगावच्या घटना ताज्या असतानाच रस्तापुर पुणतांबा शिवारात बिबट्याने शेतकऱ्याच्या दुचकीला धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. तर अहिल्यानगर दक्षिणेतही एक चिमूरडीचा बळी घेतल्याची घटना ही प्रशासनाला भानावर आणण्यासाठी पुरेसी आहे.
दुर्लक्षित केलेले मुद्दे :
बिबटे ,वाघ ,सिंह ,लांडगे ,कोल्हे,हरण हे सर्व वन्य प्राणी आज मानव वस्तीत का येत आहे . या प्रश्नावर मतलबी मानव काय आणि कधी विचार करणार . यांच्या पेक्षा मानव ज्यास्त हिंसक होत आहे. त्याच्या बोलण्याच्या व नियोजन करण्याच्या शक्तीचा गैरवापर केला जात आहे . परिणामी हे प्राणी आपल्या आश्रयस्थानपासून मानवी वस्तिकडे आपला मुक्काम हलवत आहे . अलीकडच्या दशकात डोंगर दऱ्यात मोठ्याप्रणावर जंगल तोड झाली. अनेक मोठ्या डोंगर कापून शेकडो स्टोन क्रशर सुरू त्याच्या आवाजने या वन्य प्राण्यांचे अन्न पाण्यासाठी स्थलांतर सुरू झाले . परिणामी हे सर्व मानवी वस्तीत येऊ लागले. यांच्या वाढत्या संख्येचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यालाही करणे हेच कारण जबाबदार आहे. पूर्वी सुरक्षित जंगल ,डोंगर दऱ्यात याच नर मादी दोन तीन वर्षातून एकत्र येत त्यामुळेही यांचे प्रजनन हे संथ गतीने सुरू होते. आज हे असुरक्षित झाल्याने समूहाने भ्रमण करीत आहे. याच कारणांनी यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारच्या चुकीच्या विकास धोरणांनी या वन्य प्राण्यांची डोंगर दऱ्यांतली ,जंगलातली निवास व्यवस्था ही मोडीत निघाले. आज या वन्य प्राण्याना शेतकऱ्यांच्या शेतातले उस, मोठी वाढणारी पीक हे निवास वाटू लागले आहे. तर त्याचे पाळीव प्राणी व मुले ,बसून कामकरणारे शेत मजूर ही भक्ष वाटू लागली आहे.
काय केले जाऊ शकते ?
सरकारने या वन्य प्राण्यांच्या तहान भुकेचा उपाय हा निसर्गावर सोडला आहे. यामुळेच यांना मानवी राहिवासाकडे आपला मोर्चा वाळवावा लागण्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. .सरकारने काढलेला माध्यम मार्ग म्हणजे या वन्य प्राण्याने मानवी बळी घेतला तर पीडित कुटुंबाला उपचार , मयत झाला तर प्रती मानसी नुकसान भरपाई म्हणून सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करते . याने फक्त पीडित कुटुंबाला दिलासा मिळत असला तरी तहानेने आणि भुकेणे व्याकुळ वन्य प्राणी हे मानवावरच हल्ले करणार या समस्येचे कायमस्वरूपी समाधान निघताना दिसत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी वन्य प्राणी आरक्षण सुनिश्चित करावे लागणार आहे. त्यासोबत या प्राण्यांच्या भक्षणाची व्यवस्था निर्माण करणे फायद्याचे आहे .दुसरीकडे भटके कुत्र्यांचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. व कुत्रे व छोटी जनावरे बकरी ,बछडे , हे बिबट्यांचे सोपे सावज आहेत. आणि वन विभाग हे सहजतेने उपलब्ध करू शकते. भटक्या कुत्र्यानी देखील मानवी जीवन धोक्यात टाकले आहे. यावर थेट सर्वोच्च न्यायालयाने देखील कडक आदेश दिलेले आहे. त्याचीही पालन होईल. बिबट्याना त्यांचे भक्ष व पाण्याची सोय केली तर त्यांचे मानवावारील हल्ले कमी व्हायला मदत होईल. याच भटक्या कुत्र्यांचा उपयोग बिबट्यांचे भक्ष केले जावू शकतात.
याशिवाय ही व्यवस्था मानवी राहिवासापासून दूर बंदिस्त पण मोकळेपणा किंवा मुक्त विहार असल्याचा अभ्यास तयार करून त्या ठिकाणी केली जावू शकते. यावर शासनाचा खर्च हा कमी असणार आहे. यासाठी फक्त इमानदार व पारदर्शक व्यवस्था उभारावी लागेल. ते सरकारसाठी अशक्य नाही. त्यासोबतच या प्राण्यांचा नेमका आकडा किती आहे हे निश्चित करणे सोपे होईल. या सोबत सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गचक्र निर्वेध सुरू राहील. हे विस्कळीत झाल्यानेच आम्हाला विदेशातून चित्ते आयात करावे लागले आहे. तेही आपण वाचवू शकलो नाही. कारण त्याची नैसर्गिक मुक्तता यात आपल्या व्यवस्थेने बाधा निर्माण केली .
