प्रधानमंत्री पिक विमा योजनयेत सहभागी शेतकऱ्यांच्या नुकसान निश्चिती बाबत सर्वेक्षण सुरू
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मुळे म्हणजेच पावसातील खंड या बाबीमुळे महसूल मंडळात सलग तीन आठवडे म्हणजेच २१ दिवसाचा पावसाचा खंड पडला असेल व शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये अधिसूचित पिकाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम विमा स्वरूपात देण्यात येते.
यावर्षी पावसाळ्यात जुलै ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू पिके गेल्यात जमा आहेत, पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, बाजरी, पिकांची वाढ खुंटलेली आहे त्यामुळे खरीप हंगाम पिकांचे उत्पादनात घट होणार आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने पिक विमा भरलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तालुकास्तरावर विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक व तलाठी असे राज्य शासनाचे अधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. सदर समिती अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी यादृच्छिकपणे (रँडमली) पाच टक्के क्षेत्राचे नजर अंदाज सर्वेक्षण करून नुकसानीचे मूल्यमापन करणार आहे व नुकसानीची टक्केवारी निश्चित करणार आहे, सदर अंदाज पूर्ण महसूल मंडळाला लागू असणार आहे,तरी या वर्षी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई मध्ये राहता तालुक्यातील राहता, शिर्डी,लोणी, बाभळेश्वर व पुणतांबा या पाचही मंडळाचा समावेश आहे,सलग २१ दिवस पुणतांबा व शिर्डी मंडळात पाऊस झाला नसल्याने कृषी विभाग कडून पुणतांबा शिर्डी मंडळाचा समावेश २१ दिवस पावसाचा खंड या निकषाद्वारे करण्यात आला आहे. या समावेश मुळे किमान २५ टक्के मर्यादे पर्यंत आगाऊ रक्कम पीकविमा भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे.पुणतांबा मंडळात पुणतांबा, रस्तापुर,वाकडी, धनगरवाडी, चितळी, शिंगवे, जळगाव, संभाजीनगर, नथुपाटलाची वाडी,रामपुरवाडी,येलमवाडी,या गावाचा समावेश आहे.जर अडीच मिलीमीटर पाऊस झाला नाहीतर त्या दिवशी पावसाचा खंड पकडण्यात येतो,तरी सदर नुकसान बाबत चा अहवाल दोन दिवसात पूर्ण करून मा. जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.
विलास पेटकर (शेतकरी पुणतांबा)
पिक विम्याची रक्कम ठरविताना शासनाने शेतकऱ्याच्या हिताचा विचार करावा,महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री हे राहाता तालुक्यातील असूनही मागील वर्ष्याचे लाल कांद्याचे अनुदान रखडले आहे त्याबाबत लक्ष देतील का?
आबासाहेब भोरे (तालुका कृषी अधिकारी राहाता):
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई मध्ये राहता तालुक्यातील राहता, शिर्डी,लोणी, बाभळेश्वर व पुणतांबा या पाचही मंडळाचा समावेश आहे, तरी सदर नुकसान बाबत चा अहवाल दोन दिवसात पूर्ण करून मा. जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.
अरबाज सय्यद (राहाता तालुका प्रतिनिधी ओरियंटल विमा कंपनी ):
यादृच्छिकपणे (रँडमली) कृषी अधिकरी,संबंधित गावाचे तलाठी व विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणार,शासन निकष प्रमाणे विमा रक्कम विमाधारकांना मिळेल.
डॉ.धनंजय धनवटे (माजी सरपंच पुणतांबा-रस्तापुर):
सध्या शेतकऱ्याची परिस्थिती बिकट असल्याने सर्वाना याचा लाभ मिळावा,५० टक्के पीक हातचे गेले तरी किमान २५ टक्के ऐवजी ५०टक्के रक्कम अदा करावी.
