कुणाकडे कोणते खाते
अखेर खातेवाटप आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाकडे गृह विभाग कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे अर्थ खाते देण्यात आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांना नगर विकास, गृह निर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खाते मिळाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आपसात समन्वय साधून मंत्रिमंडळ विस्तारत यश मिळाले आहे. भाजपच्या निष्ठावंतांना दमदार खाते मिळाले असून या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे.