लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपला मित्र आहे .

देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना जनतेचे सहकार्य मिळणे अपेक्षित असते. नेमकी आपली चूक तिथेच होते व आपण कळत नकळत या भ्रष्ट यंत्रणेच्या कटकारस्थानाला बळी पडतो.
आमच्याकडे प्रत्येक सरकारी कर्मचारी हा “लोकसेवक ” या व्याख्येत बसतो. त्याच्या बेशिस्ती व गैर मार्गाने संपत्ती जमा केली तरी तो गुन्हा आहे. एखादे काम करण्यासाठी पैसे मागितले तरी तो भ्रष्टाचार आहे. या लोकसेवकाने आपल्या अधिकाराचा गैर वापर केला तरी गुन्हा आहे. अशा सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्रत्येक पीडित नागरिकाला आहे.
सरकारने त्यासाठी स्वतंत्र रचना कार्यान्वित केली आहे. व ती अत्यंत सुरळीत , सुरक्षित ,साधी सोपी आहे . त्यासाठी तुम्ही या संकेतस्थाळावर जा. म्हणजे तुमचे काम सोपे होईल.
हि तक्रार करताना तुमच्या मनात येणारे हे वीस पंचवीस प्रश्न आहे. त्याची उत्तरे यात आहे. ती वाचा. निर्भय व्हा आणि भ्रष्टाचार थांबविण्याचे पहिले पाऊल उचला.

1.

सापळा रक्कम कोणाकडून पुरविली जाते?
सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरविली जाते.

2.

कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास ACB कार्यालयामार्फत केला जातो ?
शासकीय नोकराने लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा व पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार.

3.

अपसंपदा प्रकरण म्हणजे काय?
शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःचे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणे.

4.

तक्रारदार कोणाविरुद्ध लाचेची मागणी संदर्भात तक्रार देवू शकतो?
लोकसेवक किंवा खाजगी इसम जो लोकसेवकाच्या वतीने लाचेची मागणी करील व स्विकारेल त्याच्या विरोधात तक्रार देऊ शकतो.

5.

लाचेच्या मागणी संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध देता येते का?
ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुद्ध तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करील अशा लोकसेवकाविरुद्ध.

6.

सापळा कारवाई म्हणजे काय?
लाचेची मागणी, लाच स्विकारताना व लाच देताना ऐसीबी मार्फ़त सरकारी नोकरास रंगेहाथ पकडणे.

7.

सापळा रक्कम तक्रारदारास परत मिळते का?
होय. सापळा रक्कम तक्रारदारास लवकरात लवकर परत केली जाते.

8.

लाचेच्या मागणीची तक्रार केव्हा देता येते?
सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरीता तसेच कायदेशीर काम न करण्याकरीता पैशाची/इतर गोष्टींची मागणी होत असेल तेव्हा.

9.

सापळा करावाईकारता तक्रारदारास अेसीबी कार्यालयात हजर रहावे लागते का?
होय, सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.

10.

अेसीबी कार्यालयाची वेबसाईट कोणती आहे?
www.acbmaharashtra.gov.in, www.facebook.com/MaharashtraACB

11.

तक्रारदारांची ओळख अेसीबी गुप्त ठेवते का?
होय, लाचेचा सापळा वगळता इतर सर्व गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते.

12.

सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेवाकाकडून तक्रारदारास धमकी प्राप्त होत असल्यास?
अेसीबी मार्फत आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून आरोपी लोकासेवाकाचा जामीन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते.

13.

लाचलुचपत विभागात खाजगी व्यक्ती समाविष्ट होऊ शकतो का?
नाही, भ्रष्ट अधिकाऱ्याची माहिती कोणीही अेसीबी कडे देऊ शकतो.

14.

प्रत्येक जिल्ह्यात अेसीबी कार्यालय उपलब्ध आहेत काय?
होय.

15.

तक्रार कोठे नोंदविता येईल तक्रारदार राहतो त्या ठिकाणी की आरोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी?
कोठेही, १०६४ क्रमांकाद्वारे.

16.

अेसीबी कोणाच्या देखरेखीखाली कार्य करते?
महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

17.

तक्रारदारांना पैशाच्या रक्कमेच्या स्वरूपात अेसीबीकडून बक्षीस दिले जाते का?
अपसंपदेच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारांना बक्षीस देण्याची तरतूद आहे.

18.

तक्रार नोंदविण्याकरिता कोणता टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे का?
होय, १०६४ व १८०० २२२ ०२१

19.

तक्रार कशी नोंदविता येते?
वेबसाईट मार्फत, फेसबुक पेज मार्फत, मोबाईल अॅप्स मार्फत, टोल फ्रि क्रमांक १०६४, लेखी अर्ज. तसेच लाचेची तक्रार देण्याकरीता तक्रारदाराने स्वतः एसीबी कार्यालयात हजार राहणे गरजेचे आहे.

20.

सापळा कारवाईनंतरही फिर्यादीचे काम प्रलंबित राहिल्यास अेसीबी मार्फत कोणती पावले उचलली जातात?
अेसीबी मार्फत संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कायदेशीर काम पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो.

21.

अपसंपदा प्रकरणामध्ये आरोपीच्या मालमत्तेचे पुढे काय होते?
अपसंपदा प्रकरणामध्ये गुन्हा नोंदविल्यानंतर मा. न्यायालयाद्वारे लोकसेवकाची मालमत्ता गोठविली जाते.

22.

गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदारास न्यायालयात हजर रहावे लागते का?
न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान न्यायालयात साक्षीकामी हजर राहणे आवश्यक असते.

23.

अपसंपदे संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध देता येते का?
होय. ज्या लोकसेवकाने भ्रष्ट्राचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःचे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीच्या किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांच्या विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविलेली आहे अशा लोकसेवकाविरुद्ध. ज्या लोकसेवकाने भ्रष्टाचार करून मोठया प्रमाणात अपसंपदा जमा केली आहे अशा लोकसेवाकाविरुद्ध.

24.

ओनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे का?
होय, www.acbmaharashtra.gov.in वरील complaint या सदराखाली व www.facebook.com/MaharashtraACB या फेसबुक पेज वर lodge a complaint या सदराखाली.

25.

लोकसवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्विकारली तर ऐसीबी काय कारवाई करील ?(उदा. रेल्वे टीसी., ट्राफीक पुलिस, महानगरपालिकाचे नाका कर्मचारी, कोर्ट कर्मचारी यांचेकडून शपथपत्र दाखल करण्यासाठी, ई.)
अशा लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/केमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या Mobile App वरील complaint panel मधून पोस्ट करावी.

26.

मुद्दा क्र.२५ मध्ये नमुद केलेल्या घटनांवर आळा बसण्यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी ऐसीबी काय पावले उचलत आहे. तसेच त्याकारीता ऐसीबीला जनतेकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे ?
होय. लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/केमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या Mobile App वरील complaint panel मधून पोस्ट करावी.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *