आ देखे जरा किसमे कितना है दम ..
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे प्रचार सुरू आहे. ही निवडणूक प्रत्येकाला जिंकायची आहे. मोठे पक्ष आपल्या यंत्रणा उभ्या करतात. पदयात्रा ते हेलिकॉप्टर ने प्रवास करून सभा आयोजित केल्या जातात. तर काही उमेदवार एकटेच प्रचार करतात. तर काही दुचाकीच्या रॅली काढतात.
तस पाहता राज्यात राजकारणाचा झालेला विचका हा भल्याभल्यांना घाम फोडणार आहे. शिर्डी , श्रीरामपूर मतदार संघात होवू घातली निवडणूक जरा वेगळीच आहे.याठिकाणी सत्ताधारी गटाने दोन उमेदवार देऊन स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेतला आहे. इथे प्रचंड मत विभागणीचा फायदा आज तरी कॉंग्रेस ला होताना दिसतोय. कालपर्यंत इथे महायुतीचा एक उमेदवार रिंगणात होता. आज इथे दोन उमेदवार सत्ताधाऱ्याकडून निवडणूक लढत आहे. अधिकृत उमेदवाराच्या पोस्टर वर मोदीचे ठळक फोटो आहेत


तर दुसऱ्या उमेदवारच्या पोस्टर वर हे छोटे फोटो आहेत. परिणामी भाऊसाहेब कांबळे यांना व्हील चेअर वर येऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे. ही लढतही राधाकृष्ण विखे यांचे अडचणीत भर टाकणारी आहे

शिर्डी मतदार संघात सर्व प्रमुख प्रसार माध्यमांनी विखे सोडून कुणाला जागा मिळू न देण्याचा निर्णय बड्या मीडिया हाऊसच्या संपादक मंडळिणी घेतेलेला असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना धावपळ करायला लावणारी प्रतिस्पर्धी महिला उमेदवार प्रभावती घोगरे या सोशल मीडिया वर सर्वात आघाडीवर आहे. त्यांनी याच सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांच्या मनात जागा मिळवायला सुरुवात केली आहे.

याच मतदार संघात राधाकृष्ण विखे पाटील यांना मतमोजणीच्या सलग तेरा फेऱ्यात मागे टाकणारे राजेंद्र पिपाडा यांनी थेट मतदार संपर्क या पद्धतीने आपला प्रचार सुरू ठेवला आहे.

कोपरगाव मतदार संघात अपक्ष उमेदवार संजय काळे यांचा एकला चलो प्रचार हा मतदारांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
