तीन दिवसापासून पुनतांब्यात बीएसएनएलची सेवा ठप्प
कर्मचारी व अधिकारी सुट्टीचा आनंद घेण्यात मस्त तर ग्राहक त्रस्त
ऐन स्वतंत्रता दिवसाच्या दुपार पासून पुणतांबा बीएसएनएल सेवा बंद पडली आहे. बीएसएनएलच्या कामचुकार व्यवस्थेमुळे परिसरातील ग्राहकाची दूर संचार सेवा खंडित झाली आहे. याचा फटका सुमारे सहाशे ते सातशे बीएसएनएल ग्राहकाना बसला आहे. गेल्या तीन दिवसापासून कुठेतरी फाईबर ऑप्टिक केबल तुटल्याने ही सेवा खंडित झाल्याचे समजते.
याबाबत अनेक ग्राहकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आज सुट्टी आहे. यांचा काम सुरू आहे . चारशे मीटर केबल विहीरीचे कामात ओढली गेली आहे. अशी उत्तरे दिली जात आहेत.
वास्तविक पाहता अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान बीएसएनएल वापरत आहे. त्यामुळे कुठेही केबल तुटली की त्याच मिनिटाला संबंधित उपविभागीय अभियंत्यापासून ते महा व्यवस्थापकाच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याना व केबल जोडणारे ठेकेदार यांच्या मोबाईलवर मेसेज जातो. असे असूनही ग्राहक सेवा विस्कळीत किंवा खंडित होत असेल तर महाव्यवस्थापकाने झोपेचे सोंग न घेता कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचेवर कार्यवाही करणे ग्राहकाना अपेक्षित आहे. लवकरच पुणतांबा , कान्हेगाव , वारी ,शिंगवे , गोंडेगाव , मातुलठाण, रामपूर वाडी येथील नागरिक अहमदनगर व्यवस्थापकांची भेट घेणार आहे. यापरिसरात बीएसएनएलची सेवा वारंवार खंडीत होते. तसेच या परिसरात सेवा अबाधित राहावी म्हणून केलेले रिंग सर्किट हे फक्त कागदावरच कार्यान्वित आहे. याच्या चौकशीसाठी व अखंड सेवेकरीत परिसरातील बीएसएनएलचे संचालक रविकाका बोरवके यांनी लक्ष घालावे अशी मागणी या ग्रामस्थानी केली आहे .