प्रश्न आमच्या अस्मितेचा: छगन भुजबळ
नाशिक| प्रतिनिधी| आपण सभागृहात तर आवाज उठवू तसेच रस्त्यावर उतरून देखील लढाई लढू केवळ राज्यात नाही तर देशभरात आपण आवाज उठवून ओबीसींचा एल्गार पुकारणार आहोत त्याला आपल्याला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आपल्याला मंत्री पदाची कुठलीही हाव नाही. ज्या वेळी आरक्षणाचा आपण राजीनामा देऊन सभेला उपस्थित होते. त्यामुळे आपल्याला मंत्री पदाची फिकीर नाही. प्रश्न मंत्री पदाचा नाही प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणारा सहभाग आपल्याला हवा आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आज छत्रपती संभाजीनगर रोड येथील जेजुरकर लॉन्स नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, शिवाजीराव नलावडे, मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, डॉ.कैलास कमोद,ॲड. सुभाष राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे, सत्संग मुंडे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नवनाथ वाघमारे, गोरख बोडके, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, पार्वतीताई क्षिरसाठ, अनिताताई देवतकर,ॲड.मृणाल ढोले पाटील, ॲड.मंगेश ससाणे, राजाराम पाटील, पंढरीनाथ थोरे, डॉ.स्नेहा सोनकाटे, अनिल निकम, सपना माळी, सुनील मेटे, शंकरराव लिंगे, दीपक बोराडे, पांडुरंग मिरगळ, ॲड.राजेंद्र महाडोळे, नवनाथ ढगे, राजाभाऊ सोनार, समाधान जेजुरकर,डॉ.योगेश गोसावी,प्रा.ज्ञानेश्वर दराडे, कविता कर्डक, अंबादास खैरे,योगिता आहेर, मुकुंद बेनी, यांच्यासह विविध समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.