कॅमेऱ्याच्या प्रतिकृतीचं घर !
माणूस ध्येय वेडा असला की त्याच्या इच्छा पूर्ण होण्याला निसर्ग मदत करतो. व्यक्ति तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. याचच एक उदाहरण म्हणजे बेळगावात निवास करणारे रवी होंगल हे पेशाने छायाचित्रकार आहेत. त्याच वेगळेपण हे त्याच्या कृतीतून दिसून येते.

कॅमेरा आणि कॅमेरा हा छंद जोपासताना त्यांनी आपल्या स्वप्नातील घर हे देखील कॅमेऱ्याच्या प्रतिकृतीचं बनवलं आहे. त्यांच्या या घराला त्यांनी ” क्लिक ” असे नाव दिले आहे. हा छंद इथेच थांबला नाही तर त्यांनी आपल्या मुलांची नावे ही कॅमेऱ्याची ठेवली आहे. त्यांच्या या छंदाची नोंद बीबीसी ने घेतल्यावर हे घर पाहण्यासाठी आता लोक जावू लागली आहेत.