हवामान बदल,पीक संरक्षण
हवामान बदल किंवा जागतिक तापमानात वाढ हा गेल्या काही वर्षात आपल्या देशात चर्चिला जात असलेला विषय आहे . व याच्या दुष्परिणामांना गेले तीन चार वर्ष आपण सामोरे जात आहोत . यात तीनही ऋतूत बदल झालेले आपल्याला अनुभवलं येत आहे . जसे पावसाळ्यात उन्हाळा ,हिवाळा आणि उन्हाळ्यात पाऊस तसेच पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे . त्यामुळे एकाच वेळी खूप पाऊस पडतो त्यानंतर तीन आठवडे पाऊस पडत नाही . असेच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे त्यासोबतच त्यांचे दिवस कमी होऊन उष्णतेत वाढ होत आहे .
परिणामी खरीप हंगाम उशिराने होत आहे . आणि ऐन पीक काढणीच्या वेळी पाऊस पडत आहे . यातून खरिपाचे पिकाचे नुकसान होऊन उत्पन्न कमी होत आहे . रब्बीच्याही पेरण्या वेळेवर होतील याची कुठली शाश्वती राहिली नाही . कारण ऑकटोबर नोव्हेम्बर मध्ये धो धो पाऊस होतो. याशिवाय संपूर्ण रब्बी हंगामातही अधून अधून पाऊस पडतच असतो. याच कारणांनी खरिपासोबत रब्बीचेही पिके हाती लागत नाही . व रोग आणि किडीला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. परिणामी शेतकऱ्यांना पीक संरक्षणाचा खर्च वाढत आहे. रब्बी हंगामातील पीक उत्पादनाची पूर्वी जेंव्हढी शाश्वती होती ती आता राहिली नाही .
हवामान बदलाच्या पार्शवभूमीवर आता कृषी संशोधकांना त्यांच्या सध्याच्या संशोधनात योग्य ते बदल करणे अतिशय आवश्यक आहे . या बदललेला पोषक असा प्रतिसाद देतील अशा जाती विकसित करणे त्याचसोबत शेतीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करणे कि जेणे करून शेतकरी सहजतेने पीक संरक्षणाचा खर्च कमी करण्यात सफल होतील . शेतकऱ्यांनी या बदलाचा विचार करून आपले पीक नियोजन करणे त्यांच्याकरिता हिताचे असेल .
