“मका पिकावरील कीड व रोगांचे नियंत्रण”
मका पिकावर प्रामुख्याने खोडकिड, अमेरिकन लष्करी अळी व कणसे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो.
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट, १.२ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येतात फवारणी करावी.
अमेरिकन लष्करी अळीच्या वाढीच्या लवकरच्या (एक ते तीन अवस्था) अवस्थांमध्ये निमअर्क, १५०० पीपीएम, ५ मि.ली. प्रती लिटर पाणी किंवा निंबोळी अर्क,५% यांची फवारणी करावी किंवा क्लोरॅट्रनिलीप्रोल १८.५% एस सी, ४० जीएआय प्रती हेक्टर किंवा इमामेक्टिन बेंजोएट, ५% एस जी,८ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी किंवा स्पिनेटोरम ११.७ एस जी, ०.५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दुसरी फवारणी पंधरा दिवसांनी करावी.
मका पिकावरील किडींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना किडींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांचे व इतर पर्यायी कीड वाढवणा-या झाडांचे अवशेष नष्ट करावेत तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
कणसे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिसया परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत तसेच एचएएनपीव्ही, २५० एल. ई. प्रती हेक्टरी वापरावे.
मका पिकावरील टर्सीकम पर्ण करपा व मेडिस पर्ण करप्याच्या नियंत्रणासाठी मेंकोझेब, २.५ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात ८-१० दिवसाच्या अंतराने फवारावे किंवा कार्बेंडेझीम, १२% + मेंकोझेब, ६३% डब्लू. पी. २ ग्रॅम र् किंवा अॅझोक्झिस्ट्रोबीन, १८.२% + डायफेनकोनॅकझोल, ११.४% एस.सी. १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मका पिकावरील मुळकुज/मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा हरजीयानम, २% डब्ल्यू. पी. २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पीक पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .