पंधरा दिवसातील दुसरी घटना , ग्रामस्थात संताप
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुणतांबा नगरीत पंधरवाड्यात दोन मंदिरात विटंबनेच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पहिल्या घटनेतील आरोपी जेल मध्ये असताना दुसरी घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज पुणतांबा बंद ठेवण्यात आले आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवला असून वरिष्ठ पोलिस अधिकारी पुणतांबा गावात ठाण मांडून घटनेचा तपास करीत आहे.
पुणतांबा हे धार्मिक वारसा असलेले तीर्थस्थळ आहे. ऐतिहासिक शेतकरी संप, रेल्वे आंदोलन ही या गावाची नवी ओळख आहे. याठिकाणी गोदावरी उत्तर वाहिनी होते. त्याच ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात काल (रविवारी ) मध्यरात्री नंतर नंदिची व मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कलबुर्गी शिर्डी विभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे राहाता तहसीलदार अमोल मोरे यांनी घटणस्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थाना घटनेचा तपास लवकरात लवकर लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणतांबा गावात अचानक अशा जातीय तेढ ,तनाव निर्माण होईल अशा घटना घडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. याच कारणांनी आज गावचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. शाळा . बँक, अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्यात आले आहे. मारोती मंदीरातील विटंबणेच्या घटनेचा आरोपी हा राहाता कारागृहात आहे. त्या घटनेच्या दोन तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. तीच अपेक्षा या घटनेतही ग्रामस्थाना आहे. तसेच अशी घटना पुनः घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी समोर येत आहे.