सूर्यतेज संस्थेच्या दीपावली पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेने कोपरगावकराना नयनरम्य रांगोळ्यांचे प्रदर्शन…

photo by sushant ghodake forteatimenews

सालाबादप्रमाणे परंपरेनुसार दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात शनिवार दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत करण्यात आले होते.यात दर्जेदार व नयनरम्य रांगोळी साकारून सलग बाराव्या वर्षी कोपरगावकरानी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

या स्पर्धेचे आयोजन कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद ,बाल रंगभूमी परिषद,अहिल्यानगर,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, एच.एम.राजपाल, सुमंगल प्लायवुड, कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने केले.


शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम घरापुढे रांगोळी काढण्याची भारत वर्षात मोठी परंपरा आहे.६४ कला प्रकारामध्ये रांगोळी कलेला महत्व आहे. सूर्यतेज
संस्थेचा कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व समावेशक करण्यासाठी बंदिस्त कार्यालय , रांगोळीचा ठराविक आकार, रंग संगती यांचे बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपरिक,निसर्गचित्र, व्यक्तीचित्र, भौमितिक आकार,सामाजिक विषय,व्यंगचित्र असे सहा विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत विविध कला प्रकारात कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या आहेत. प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक ठिकाणी कलेचे पदवीधर परीक्षण सहाय्यक, छायाचित्रकार,नोंदणी अधिकारी,संस्थेचे प्रतिनिधी,निरीक्षक,गाईड अशी ऑनलाइन ६ पथके तयार करून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करून व छायाचित्र हे सर्व परीक्षण संदर्भात अंतिम निर्णयासाठी कलेचे उच्च पदवीधर समिती कडे सुपूर्द करण्यात आला आहे.त्याचा अंतिम निकाल प्रसारमाध्यमाद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समिती प्रमुख कल्पना हेमंत गीते यांनी दिली आहे.

स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय रांगोळीकार, सूर्यतेजच्या प्रा.मसुदा दारूवाला यांनी कोपरगाव भूषण दत्तोबादादा जगताप यांची व्यक्ती रेखा विशेष प्रदर्शनार्थी साकारुन त्यांचा कार्यगौरव केला आहे.


प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,यांचे वतीने देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,प्रा .लताताई भामरे, प्रा.कल्पनाताई गीते,डॉ.नीलिमाताई आव्हाड, ॲड.स्मिमाताई जोशी, प्रा.मसुदा दारुवाला,वासंतीताई गोंजारे,प्रा.प्राजक्ता (देशमुख) राजेभोसले,भाग्यश्रीताई जोशी,प्रा ऋतुजा कोळपकर,प्रा.राधिका तोरणे, वर्षाताई जाधव, प्रा.ऐश्वर्या वाघमारे,गौरी वायखिंडे (मळिक), प्रा.अनिल अमृतकर,प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अतुल कोताडे,जयंत विसपुते,अमोल शिंपी, प्रा.वंदना अलई,ॲड.महेश भिडे,तेजल सोनवणे, महेश थोरात,सुमित शिंदे, अनंत गोडसे, कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,नाट्य परिषद ,कलाप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले आहे.अनेक नयनरम्य रांगोळी प्रदर्शन मुळे परिसरातील लोकांनी रांगोळी कलाकार व आयोजकांचे कौतुक केले आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja