निवडणुक एक अर्थ अनेक … 

देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. अनेक समीकरण मांडली जात आहे. प्रत्येक तर्क हा वेगळा आहे. गेल्या वर्षभरातील राजकीय घटना या लोकशाही वरचा विश्वास उडवणाऱ्या आहेत. याच राजकारण्यांना देणेघेणे नाही . हे ठामपणे का म्हणता येत तर निवडणूक प्रचार व त्यात केले जात असलेले आरोप प्रत्यारोप हे त्यांनाच विवस्त्र करणारे आहे. कुणी कुणावर काय आरोप केले , कुणी कुठल्या राजकीय घटनेचे खुलासे केले. याबाबत लोक जागरूक आहेत .त्याबाबत आपण मुद्दाम खुलासा वा आठवण करून देण्याची गरजच नाही . 

गेल्या वर्षा दोन वर्षात भाजपाने जेव्हढे म्हणून राजकारणी खासकरून विरोधी पक्षातले याना आपल्यात सामावून घेण्याचा सपाटा लावलाय, आश्चर्यकारक आहे. एकीकडे प्रादेशिक पक्ष पूर्णपणे व कूटनीतीने रसातळाला नेने म्हणा कि संपवणे यात भाजपाला चांगले यश मिळाले आहे.  पण यानिमित्ताने पवार ,चव्हाण , ठाकरे याचे सह अनेक परिवारांची राजकीय मक्तेदारी, दबदबा कमी करण्यात भाजपा शंभर टक्के यशस्वी झाली आहे. असे जरी असले तरी या ठराविक राजकीय कुटुंबांचे सहकुटुंब राजकारणातले प्रवेश हे नवी समीकरणं जन्माला घालत आहे. याने ते चार सौ पार होणार आहेत का याच उत्तर म्हणजे नक्कीच नाही. हे त्यांनाही माहित आहे. 



विडिओ सौजन्य : eci .

मग दुसरा काय प्लॅन तर जे निवडून येतील ते सर्व आपलेच आहे. हि भूमिका स्पष्ट व उघड असणार आहे. यातून आपलेच पराभूत झाले तरी पक्षाचं नुकसान नाही. नाथाभाऊ वगळता भाजपात बंड करण्याची धाडस कुणी केलेलं नाही.तसेही कार्यकर्ते आणि मोदी,शहा सोडले तर इतर कुणात शक्तीच नसल्याने ते आहे तिथे, आहे तसे राजकीय जीवन जगण्यास तयार आहे. 

आता प्रश्न हा आहे कि राजकारणासाठी कुणी रक्ताच्या नात्यात अंतर पाडून घेतील का तर तसे होणार नाही. मग वेड्यात कोण निघणार तर नेहमीप्रमाणे या नेत्यावर ,त्यांच्या परिवारावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते हेच या प्रक्रियेचे बळी आहेत.मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे कुठल्याही स्तरातील असोत.  

राजकीय पक्षाच्या आय टी सेल ज्याने रोज सोशल मीडियावर पोस्ट केलेले खोटे ज्ञान ,खोटा इतिहास याने त्यांचेच कार्यकर्ते मानसिक कमजोर केले जात आहे. रोज त्यांच्या मेंदूवर होत असलेले खोट्या इतिहासाचे, अखंड भारताचे फाजील स्वप्नांचे आघात त्यांच्या सामाजिक अस्तित्वाला धक्का पोहचविणारे ठरणार आहे .परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे गुलामीकडे वळवले जात आहे. त्यांच्या क्रियाशीलता , कल्पकता यांचा ना समाजाला ,ना कुटुंबाला ना देशाला कुठलाही फायदा होणार नाही.    



विडिओ सौजन्य : eci .

आमच्या सोबत कुणीही या नाहीतर ईडीच्या मार्फत आमच्यात आणू.भाजपाच्या या नीतीने भले भले भ्रष्ट नेते ज्यांना कार्यकर्ते देव मानतात असे सर्व पक्ष सोडून पळाले. त्या सर्वांचं पापक्षालन झालं. आता त्यांचं पुनर्वसन करणे यासाठीचाही हच्चा भाजपने आपल्याकडे राखून ठेवला आहे. त्यामुळेच कुणी चकार शब्द काढायला तयार नाही. असे असले तरी या निवडणुकीत भाजपाला जे अपयश येणार आहे. ते मोदी आणि शहांच्या माथी मारणं हि सोपं होणार आहे. अर्थात हि भावना एकनिष्ठ कार्यकर्ते ज्यांनी भाजपासाठी पिढ्या झिजवल्या , खपवल्या आहे. त्यांच्या मनात आहे.  

कॉँग्रेसचे राजकारण आता मुस्लिम मतांवर आधारलेले आहे. असे चित्र असले तरी समस्त हिंदू समाज हा भाजपची मक्तेदारी असल्याचे चित्र देश भर असल्याने कॉंग्रेसच मुस्लिम प्रेम हे स्पष्ट पणे दिसून येते. पण त्यांची संख्या वीस ,तीस टक्के आहे . ती संख्या त्यांचे सरकार स्थापन करून देवू शकत नाही. याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच तर त्यांनी सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केलेले नाही. त्यांच्या सोबत गेलेल्या सर्व स्थानिक ,प्रादेशिक राजकीय पक्षांना आपले अस्तित्व सुरक्षित वाटते. ही बाब विचार करायला भाग पाडणारी आहे. आपल्या राज्यात भाजपने प्रादेशिक पक्षांची काय अवस्था केलीय हे अवघ्या देश पाहतोय.

election 2024
photo credit to eci social media page

अलीकडे भयभीत झालेल्या भाजपने शतप्रतिशत मतदानाचा प्रचार करायला सुरुवात केली. कारण मतदानच झाले नाही तर देशातली लोकशाही संपुष्ठात आणल्याचा आरोप याना झेपण्यासारखा नाही. मग तो पक्ष कितीही मोठा असो , त्याच्या कडे पक्ष निधी कितीहि असो.याने जनतेच्या मनातले ,डोक्यात घर करून बसलेला आरोप खोडता येणार नाही .

राष्ट्र प्रथम म्हणणारे भाजपाची कृती तर राष्ट्राच्या संपत्तीला लिलावात काढणारी आहे. जी सरकारी दूरसंचार कंपनी चंद्रावर सिग्नल देते. ती पृथ्वीवर देशवासियांना का सिग्नल देऊ शकत नाही. जी पॅसेंजर रेल्वे पंच्चाहत्तर वर्ष लाखो गोर गरिबांची फुकटात ने आन करीत होती. ती आज दिवसातून एखादी वेळी अवेळी सुरू आहे. अनेक रेल्वे स्थानकावरचे थांबे बंद करून हजारो गांव बेरोजगार झाली आहे.या ग्रामस्थाना पोटची खळगी कशी भरायची हा प्रश्न देशाच्या निवडणुकीपेक्षा मोठा वाटतोय. याची जाणीव राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना झाली तरी खूप आहे. 

या लेखातील विचार हे लेखकाचे व्यक्तिगत आहेत ,कॉपी राइट्स @ माधव ओझा , शिडी /पुणतांबा.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *