शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक एम.व्ही. जया गौरी यांची नियुक्ती
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एम.व्ही.जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक यांचा पत्ता शिर्डी शासकीय विश्रामगृहातील कृष्णा कक्ष आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९०२२०१४२०३ व ई-मेल आयडी shirdipoliceobserver@gmail.com असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून प्रियांका आठरे (महिला पोलीस उपनिरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय विश्रामगृहात सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी कळविले आहे.