महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज वर ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व
अध्यक्षपदी गांधी यांच्या बिनविरोध निवडीसह एकतर्फी सत्ता ताब्यात
मुंबई ःदिगंबर मराठे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण राज्यातील मतमोजणी मुंबई येथे पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील :शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल” ने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच व्यवस्थापन समिति मध्ये 10 पैकी 8 जागी तर
गव्हर्निंग काऊन्सील च्या 90 पैकी 85 जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले.
वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे (सांगली) यांनी 1605 मते मिळवून विरोधी उमेदवार अनिल गचके (482 मते) यांना 1123 मतांनी पराभूत केलेे.
मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करूणाकर शेट्टी यांनी 135 मते मिळवून विरोधी उमेदवार व मुंबई जिल्हा बँकेच्या संचालिका कविता देशमुख (55 मते) यांचा 80 मतांनी पराभव केला.
ललित गांधी यांच्या पॅनेलचे विजयी झालेले अन्य उपाध्यक्ष पुढील प्रमाणे, पश्चिम महाराष्ट्र विभागातुन रमाकांत मालु व दिलीप गुप्ता, उत्तर महाराष्ट्र विभागातुन संजय सोनवणे व सौ.संगीता पाटील, कोकण विभागातुन श्रीकृष्ण परब विजयी झाले.
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत चेंबरच्या 98 वर्षाच्या इतिहासात प्रथमच, गेल्या 40 वर्षातील सर्व 11 माजी अध्यक्ष यांचा पुढाकाराने एकता पॅनेल ची स्थापना करून निवडणूक लढवत ललित गांधी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र ललित गांधी यांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि
कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे,अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणार्या,11 माजी अध्यक्षांच्या पॅनेलचा दारून पराभव करून राज्याच्या व्यापार-उद्योगाची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ वर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित करून एकहाती सत्ता काबीज केली.
विशेष:
नाशिक शहरात झालेला एकूण 588 मतदानापैकी ललित गांधी यांच्या पॅनेलला 465 मते मिळाली तर अकरा माजी अध्यक्ष यांच्या पॅनलला मिळालेली 103 मते नाशिक मध्ये असलेले व या निवडणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावून प्रचारात उतरलेले माजी अध्यक्ष हेमंत राठी, विक्रम सारडा संतोष मंडलेचा व खुशाल भाई पोद्दार यांच्यासाठी धक्का देणारी ठरली
जोरदार व निर्विवाद विजयानंतर ललित गांधी यांनी राज्यभरातील सभासदांना धन्यवाद दिले व गेल्या दोन वर्षात केलेल्या झंझावती कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय राज्यभरातील महाराष्ट्र चेंबर च्या सभासदांना विनम्रपणे अर्पण करत असल्याचे सांगितले.
ट्रस्ट बोर्ड चे चेअरमन, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्या बरोबर पॅनेल चे नेतृत्व केले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी व सह. सेक्रेटरी जनरल जे. के. पाटील यांनी काम पाहीले. निवडणूक समितिवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितिवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरूण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहीले.