खरंच ईव्हिएम हॅक आहेत का ? तुम्हीच ठरवा
हा उमेदवार निवडून येणार नाही. याला एव्हढी मते पडणे शक्यच नाही. कसं काय निवडून आले ?जादू आहे . अशी चर्चा आपण सर्वांनी ऐकली आहे. व ऐकत आहोत. एकूणच यंदाच्या विधान सभा निवडणुकीने ईव्हीएम या जादूच्या मशिनवर जनतेने संशय घेतला आहे.
या महिनाभरात राज्यातील नव्हे तर देश पातळीवरच्या प्रसार माध्यमात चर्चा झाली. आणि सुरू आहे. पण यांचा निवडणूक आयोग मूग गिळून बसला आहे. अर्थात तसे पाहता ही व्यवस्था आपल्या अधिकाराचा दुरुपयोग व अतिरेक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या खुर्चीत बसणारा प्रत्येक आयुक्त हा स्वतःला टी एन शेषण समजतो. या गैरसमजाबाबत सामान्य जनतेची प्रतिक्रिया पाहिली तर टी एन शेषण यांचे हाताखाली शिपाई म्हणूनही काम करण्याची औकात नसलेले लोक हे पद भूषवत आहे अशी आहे.
जगभरातील निवडणुकीत जनतेची कशी फसवणूक होत आहे. का असे धक्कादायक निकाल समोर येत आहे. यावर जागतिक पातळीवर अभ्यास करून एक त्रिकूटाने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी यांनी केलेले चित्रीकरण देखील सार्वजनिक आहे. ही बाब आमच्या कुठल्या पत्रकाराने किंवा गुलाम मीडिया हाऊसने समोर आणलेली नाही. तर भारतीयांना आवडणाऱ्या इजरायलच्या दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. त्यात जगभरातील अनेक देशांच्या निवडणुकांवर कसे परिणाम घडवून आणले जात आहे. सत्तेचा खेळ कसा सुरू आहे. जनता आणि देशांशी कशी बेईमानी केली जात आहे. हे पुराव्यानिशी प्रसिद्ध केलेले आहे.
ईव्हीएम हॅक झाले ,केले , पाण्यासारखा पैसा वाटून उमेदवार निवडणूक हारले. एकूणच जनतेचा रोष निर्माण झाला. त्याला कारणही तसेच आहे. सरकारचे गुलाम असलेल्या पत्रकरानी निवडणूक निरपेक्ष झाली. हे लिहिण्यात व पटवून देण्यात जीवाचे रान केले आहे. तांत्रिक दृष्ट्या निवडणूक प्रक्रिया ही हॅक करण्याजोगी नाही. कारण ही पूर्णपणे ऑफलाइन आहे. हे जरी मान्य केले तरी ती प्रामाणिक व निर्दोष आहे. हे सारासार बुद्धी असलेल्या कुठल्याही नागरिकाला मान्य नाही. मतांची वाढणारी आकडेवारी , प्रत्यक्ष मतमोजणीला मतदानाच्या दिवशी असलेल्या क्रमांक न जुळणारे कंट्रोल यूनिट , व्हीव्ही पॅट च्या चिठ्यां आणि मतदान आकडेवारी तील विसंगती या सर्व ठळक दिसणाऱ्या बाबी ही प्रक्रिया सदोष आहे. प्रामाणिक नाही हे सांगायला पुरेसी आहे. बीबीसी च्या या मुलाखातीत अत्यंत सुंदर व सहजतेने ईव्हीएमने घेतली जाणारी निवडणूक ही दोष पूर्ण असल्याचे समोर आणले आहे.
मी स्वतः संगणक तज्ञ जरी नसलो तरी एक सरकारमान्य संस्थेतून सॉफ्टवेअर टेस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रमाणित शिक्षित आहे. कुठलेही सॉफ्टवेअर वा सॉफ्टवेअर असलेले टूल हे ज्यांच्या साठी वापारायचे आहे , त्यांच्या शंकांचे , वापरातील सहजतेचे तसेच त्याच्या प्रमाणिकतेचे प्रमाणीकरण हे वापरकर्त्या कडून करून घेणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने असे झालेले नाही. ज्या युगात आपण जगत आहोत. म्हणजेच डिजिटल इंडिया मध्ये अगदी निवडणूक ( मतदान प्रक्रिया )पूर्ण झाली की अर्धा तासात सर्व देशभरातील निकाल जाहीर केले जावू शकतात.याशिवाय आमच्या निवडणूक आयोगात हिंमत असले तर प्रत्येक बूथ वरचा होत असलेले प्रत्येक मतदानाची आकडेवारी अगदी क्रिकेटच्या स्कोअर सारखी किंवा शेयर बाजारच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आकडेवारी सारखी गावच्या चौकात डिस्प्ले केली जाऊ शकते. यासाठी तुमच्यात देशाभिमान असावा लागेल. देश व देशवासीयांप्रति तुम्हाला प्रामाणिक असाव लागेल.
(हा लेख teatimenews चे संपादक यांनी माहिती संकलित करून प्रसिद्ध केला आहे. त्यात कुठलाही बदल न करता तुम्ही जशाच्या तसा प्रसिद्ध करण्यास हरकत नाही )