मासिक पाळी आणि महिला आरोग्य जनजागृती
पुणतांबा ग्रामपंचायत उप सरपंच निकिता जाधव यांनी गाव आणि परिसरातील किशोरवयीन मुली व महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पवार, मार्गदर्शन करण्यासाठी यती राऊत यांच्यासह प्रमुख पाहुण्या म्हणून रेणुका कोल्हे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कुल, रूरल हायस्कुल, लिटल एंजल स्कुल, प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कुल, प्रियदर्शिनी स्कुल, कृषी विध्यालय पुणतांबा ह्या शाळांचे सर्व महिला शिक्षिका, सर्व विद्धयार्थीनी उपस्थित होते त्या प्रत्येक शाळेला वेंडिंग मशीन आणि हेल्थ किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या कांचन पेटकर, वंदना वाटेकर, कोमल थोरात, शैला मोरे, तसेच आदित्य जाधव, कमलेश म्हंकाळे, जेष्ठ पत्रकार किरण नाईक, संजय जोगदंड, राजू पगारे, त्याचप्रमाणे धनंजय जाधव ,सर्जेराव जाधव, गणेश बनकर, चंद्रकांत वाटेकर, प्रणिल शिंदे, विलास पेटकर, धनु शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी धनवटे, गुंजाळ, गायकवाड, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पगारे व कमलेश म्हंकाळे यांनी केले.
या महिला व युवती मेळाव्याचे आयोजन मासिक पाळी आणि महिला आरोग्य जनजागृती यासाठी केलेला होता. या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना निकिता जाधव यांनी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यती राऊत यांच्या कार्य प्रवासाची माहिती दिली. यावेळी जाधव म्हणाल्या कि, दैनंदिन जीवनामध्ये किशोरवयीन मुलींना व महिलांना आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी अडचणी, त्यांची होणारी घुसमट यासंबंधी अनेक अंधश्रद्धांना नकळतपणे कवटाळावं लागतं. त्याचा परिणाम म्हणून आपण आपल्या आरोग्याच्या समस्या आणखीनच वाढवत असतो. त्यामुळे आज योग्य अशा मार्गदर्शनासाठी यतिताईंना आणलेले आहे. त्याचा सर्व मुली आणि महिलांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला .
यावेळी महिलाना मार्गदर्शन करताना यतीताई राऊत यांनी महिलांच्या मासिक पाळीबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धा ह्या कशा चुकीच्या आहे हे उदाहरणासह पटवून दिल्यात. मासिक पाळी हे एक चक्र आहे. हे महिलांना परिपूर्णतेकडे घेऊन जात असते. याबबातीत कुठलाही न्यूनगंड बाळगायचा नसतो. मासिक पाळीच्या दिवसात बऱ्याच महिला खाण्याच्या, काम करण्याच्या, पूजाअर्चा करण्याच्या बाबतीत अनेक गैर समज आहेत. ते चुकीचं आहे. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. मासिक पाळीच्या बाबतीत ल्या जवळपास सर्वच अंधश्रद्धांचं धार्मिक, पौराणिक उदाहरणं देऊन निराकरण केले.
प्रमुख पाहुण्या रेणुकाताई कोल्हे यांनीही अतिशय समर्पक आणि सहजासहजी समजेल अशा पद्धतीने मुलींना तसेच महिलांना मार्गदर्शन केले. मासिक पाळी हे महिलांना मिळालेलं एक वरदान आहे. त्यात गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, भारी-हलका वैगेरे काहीही नसतं. त्यामुळे कुणीही लाजायचं नाही आणि घाबरायचं देखील नाही. स्त्रियांच्या गर्भातून भविष्यकाळ जन्म घेतो, म्हणूनच स्त्रियांचा वर्तमानकाळ चांगला करणे गरजेचे आहे. म्हणून आता प्रत्येक मुलींनी मासिक पाळी बाबत न्यूनगंड न बाळगता ताठ मानेने आणि अभिमानाने राहिलं पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात सरपंच स्वातीताई पवार यांनी मासिक पाळीच्या समस्याबद्दल शंका निरसन करताना वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं कौतुक केले. आभार प्रदर्शन करताना माजी जि.प. सदस्या व ग्रामपंचायत सदस्या वैजयंतीताई धनवटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित असलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्या, सर्व शिक्षिका, सर्व विध्यार्थीनींचे आभार व्यक्त केले.